एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...
लोअर परेलमधील कमला मिल्स कंपाऊंडमधल्या आग्नितांडवात मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर येतो आहे.
मुंबई : लोअर परेलमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये आग लागली आणि यात हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पब जळून खाक झालं. या कंपाऊंडमधल्या आग्नितांडवात मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर येतो आहे. कारण या बिल्डिंगमध्ये आगीचे नियम पाळले जात नाही, त्यावर कारवाई करावी अशी तक्रार मनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी केली होती. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडं दुर्लक्ष केलं.
मनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकरांनी 10 ऑक्टोबर 2017 रोजी कमला मिल्स कंपाऊंडसंदर्भात मुंबई महापालिकेकडे तक्रार केली. काहीच उत्तर मिळत नाही कळल्यावर दोन वेळा पाठपुरावा केला. पोस्टाने उत्तर पाठवल्याचे सांगत तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर मग कशाळकरांना बीएमसीकडून उत्तर मिळाले की, कमला मिल्स कंपाऊंडमध्ये कोणत्याच प्रकारची अवैध गोष्टी नाहीत.
“कमला मिल्स कंपाऊंडमध्ये रुफ टॉपवर बांधकाम करण्यात आले होते, ज्याला परवानगी नाही. शिवाय आगीसंदर्भातील जे 35 नियम असतात, तेही पूर्ण केले नसल्याचे दिसून आले. त्यानंतरच तक्रार केली होती.”, असे मनसे नेते कशाळकरांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
आता मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आज अनेकांना जीव गमावावा लागला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
काय आहे घटना?
मुंबईच्या लोअर परेल येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
संबंधित बातम्या :
मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ
मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू
कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!
कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement