एक्स्प्लोर

मनसेला दुसरा धक्का, मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळबेंचा भाजपात प्रवेश

मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळबेंनी भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

मुंबई : आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनसेला जोरदार हदरे बसत आहेत. सोमवारी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज मनसेला दुसरा धक्का बसला आहे. मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळबेंनी भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मनसेला लागलेल्या या गळतीनंतर मनसेचे काही प्रमुख नेते कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार राजु पाटील, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत.

मंदार हळबे हे आतापर्यंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून डोंबिवली मतदारसंघाचं तिकीट हळबेंना देण्यात आलं होतं, त्यात त्यांचा पराभव झाला होता.

कोण आहेत मंदार हळबे? कल्याण डोंबवली महापालिका 2010 च्या निवडणुकीत मंदार हळबे यांनी मनसेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली .2015 ते 2020 च्या कालावधीत त्यांनी मनसे विरोधी पक्ष नेता ,गटनेता या पदांची जबाबदारी पार पडली. सभागृहात अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना घाम आणला होता. याच दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मनसेकडून डोंबिवली विधानसभेची उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांचा पराभव झाला. मंदार हळबे मनसेत असले तरी आरएसएसचा पगडा त्यांच्यावर कायम होता. गेल्या अनेक दिवसांपासून हळबे भाजपमध्ये जाणार असल्याबाबत चर्चा रंगल्या होत्या आज अखेर त्यांचा प्रवेश झाला. मंदार हळबे हा सुशिक्षित ब्राह्मण चेहरा असल्याने डोंबिवलीमध्ये हळबे यांचा प्रवेश भाजपच्या पथ्यावर पडू शकतो तर हळबे यांच्या जाण्याने डोंबिवली मतदारसंघात मनसेला याचा फटका बसू शकतो. मनसे भाजप युतीबाबत प्रश्नचिन्ह कायम तर दुसरीकडे राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसे युती बाबत चर्चा रंगल्या होत्या. याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून दुजोरा दिला नसला तरी तसे संकेत देखील देण्यात आले होते. मात्र मनसेच्या मोठया नेत्याला भाजपने गळाला लावल्याने मनसे भाजपात पुन्हा दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डोंबिवलीचे मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. कदम यांच्यासह मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी आपल्या हातावर शिवबंधन बाधलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचे डोंबिवलीतील एक आक्रमक नेते अशी राजेश कदम यांची ओळख आहे. मनसेच्या स्थापनेपासून झालेल्या प्रत्येक राजकीय आंदोलनामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

MNS | मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष शिवसेनेत, मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांच्या हाती शिवबंधन

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger Controversy : दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर खोटं का बोललात? सुनील तटकरे, प्रफुल पटेलांच्या भूमिकेवर रोहित पवारांचा थेट सवाल
दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर खोटं का बोललात? सुनील तटकरे, प्रफुल पटेलांच्या भूमिकेवर रोहित पवारांचा थेट सवाल
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट; तातडीच्या सुनावणीची मागणी उच्च न्यायालयाने नाकारली, कोर्टात नेमकं काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट; तातडीच्या सुनावणीची मागणी उच्च न्यायालयाने नाकारली, कोर्टात नेमकं काय घडलं?
Sharad Pawar Mumbai: गौतम अदानी, प्रफुल पटेलांपासून संजय राऊतांपर्यंत...शरद पवारांच्या भेटीला कोणकोण रुग्णालयात पोहोचले?; राहुल गांधी, राज ठाकरेंसह कुणाचे फोन?
गौतम अदानी, प्रफुल पटेलांपासून संजय राऊतांपर्यंत...शरद पवारांच्या भेटीला कोणकोण रुग्णालयात पोहोचले?; राहुल गांधी, राज ठाकरेंसह कुणाचे फोन?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Embed widget