एक्स्प्लोर

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे : राज ठाकरे

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना भेटून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करण्याबाबतचं निवेदन दिलं.

मुंबई : मुंबईतल्या फेरीवाल्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत रेल्वेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई महापालिकेच्या दारात पोहोचले आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना भेटून त्यांनी फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करण्याबाबतचं निवेदन दिलं. सुरुवातीला रेल्वे पुलांवरील फेरीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी आता सर्वच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच त्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी आयुक्तांना सुचवल्या आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या निवेदनानंतर महापालिका फेरीवाल्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजवरील फेरीवाल्यांना येत्या 15 दिवसात हटवा. जर रेल्वेने ही कारवाई केली नाही, तर सोळाव्या दिवशी माझी माणसं म्हणजे मनसैनिक त्यांना हटवतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरला काढलेल्या संताप मोर्चात रेल्वे प्रशासनाला दिला होता. 15 दिवसांचा अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनासह भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. रेल्वे स्टेशन परिसरातले फेरीवाले येत्या 15 दिवसात हटवले नाही, तर मनसे रस्त्यावर उतरुन मनसे स्टाईलनं फेरीवाल्यांना हटवेल असा इशारा राज यांनी यावेळी दिला होता. बुलेट ट्रेनला विरोध कायम यावेळी राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध कायम असल्याचं ठणकावून सांगितलं. सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केल्याने त्यांना रेल्वेमंत्रीपदावरुन हटवल्याचा आरोप राज यांनी केला. तसंच बुलेटट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले, असं राज म्हणाले होते. मूठभर लोकांचं कर्ज देशाने का भरायचं? बुलेट ट्रेनचा लाभ काही लोकांनाच होणार आहे. तो होईल की नाही याबाबतही शाश्वती नाही. मोदींचा जुना व्हिडीओही त्याबाबत सांगून गेला. मग मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेनच्या कर्जाची परतफेड संपूर्ण देशाने का करायची? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. संबंधित बातम्या : 15 दिवसात फेरीवाले हटवा, अन्यथा 16 व्या दिवशी आम्ही हटवू : राज ठाकरे परवानगीविना मनसेचा मोर्चा, आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
VBA Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
VBA Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
Embed widget