एक्स्प्लोर

मनसेनं मध्यरात्रीच फोडली दहीहंडी तर भाजपचे राम कदम म्हणाले, दहीहंडी होणारच 

Dahihandi : दादर आणि ठाण्यात आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच असा इशारा दिल्यानंतर मनसेनं नियम झुगारत अखेर दहिहंडी फोडलीच.

मुंबई : दादर आणि ठाण्यात आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच असा इशारा दिल्यानंतर मनसेनं नियम झुगारत अखेर दहिहंडी फोडलीच.  सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. असं असतानाही दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मध्यरात्री कोरोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.

तर दुसरीकडे भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील आम्ही दहीहंडी फोडणारच असं म्हटलं आहे. आम्ही घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये पारंपारिक दहीहंडी साजरी करण्यासंदर्भात निघत आहोत. मात्र आम्हाला घरीच स्थानबद्ध करण्याची तयारी सरकार करत आहे. काहीही झाले तरी दहीहंडी होणारच, असं कदम यांनी म्हटलं आहे. 

मनसेनं काय म्हटलं होतं
मनसेच्या अमेय खोपकर यांनी फेसबुक पोस्ट करत दहीहंडीचे थर लागणारच असं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रचंड गर्दी - सरकारची डोळेझाक. युवासेना कार्यकर्त्यांचा मोठा जमाव राणेंच्या घराबाहेर धुडगूस घालतो - सरकारचं दुर्लक्ष सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमांना नियमबाह्य गर्दी. सरकारला फरकच पडत नाही.  राज्यभर राजकीय मेळावे तुडुंब गर्दीत सुरुच. सरकारची आळीमिळी गुपचिळी. मग आम्ही आमचे सण साजरे का करायचे नाहीत? असा सवाल त्यांनी केला होता. 

दादर आणि ठाण्यात आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच… नियम आणि बंधनं फक्त सामान्यांना. असले तुघलकी प्रकार आता बस्स झाले.  हिंमत असेल तर तीनचाकी सरकारने आम्हाला रोखून दाखवावं. दहीहंडीचे थर लागणारच.  गोविंदांचा आवाज मुंबईत दुमदुमणार, असं खोपकर यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
Crime News: सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
Embed widget