एक्स्प्लोर

दाऊदसारख्या गँगस्टर्सना राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्तींचा आश्रय, पोलिसांनी राजकीय नियंत्रणातून बाहेर यावं: एम.एन. सिंह

Bombay After Ayodhya: बाबरी विध्वंसानंतर मुंबईत दंगली उसळल्या, आणि त्यानंतर मुंबईच्या जीवनावर काय परिणाम झाले यासंबंधी भाष्य 'बॉम्बे आफ्टर अयोध्या' या पुस्तकात करण्यात आलं आहे. 

मुंबई: दाऊदसारखे गुंड मोठे होतात कारण त्यांना राजकारणी आणि समाजातील प्रभावशाली लोकांकडून आश्रय मिळतो, पोलिस दलातील राजकीय हस्तक्षेपामुळे काही अधिकारी भ्रष्ट बनतात असं वक्तव्य मुंबईचे माजी पोलिस आयुक्त एम.एम. सिंह यांनी केलं. एबीपी न्यूजचे पत्रकार जितेंद्र दीक्षित यांच्या 'बॉम्बे आफ्टर अयोध्या' (Bombay After Ayodhya) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. राजकारणी आणि पोलिसांचे असलेले संबंध आणि अॅंटिलिया प्रकरणात डझनभर पोलिस अधिकारी तुरुंगात कसे गेले यावरही त्यांनी भाष्य केलं. एम. एन. सिंह हे पोलिस आयुक्त असताना त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डविरोधात मोर्चा उघडला होता, तसेच 1993 सालच्या बॉम्ब स्फोटप्रकरणी त्यांनी तपास केला होता. 

बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर मुंबईत कशा प्रकारे दंगली घडल्या, त्यावेळी परिस्थिती नेमकी कशी होती याचं वर्णय जितेंद्र दीक्षित यांनी त्यांच्या 'बॉम्बे आफ्टर अयोध्या' या पुस्तकात केलं आहे. या दंगलीचा मुंबईच्या राजकीय, सामाजिक जीवनावर, चित्रपट उद्योगावर, उद्योगविश्वावर आणि अंडरवर्ल्डवर काय परिणाम झाला याचंही वर्णन या पुस्तकात करण्यात आलं आहे. हार्पलकॉलिन्स क्रॉनिकलने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

मुंबईतील तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करताना एम.एन. सिंह म्हणाले की, "दाऊद इब्राहिम राक्षस बनला कारण त्याला सामाजिक मान्यता मिळाली. समाजातील चांगल्या माणसांनी त्याच्याशी सलगी केली. अनेक बांधकाम व्यावसायिक आणि चित्रपट निर्मात्यांनी पगारावर गॅंगस्टर्स पोसले. राजकारणी गुन्हेगारांचा वापर करतात कारण त्यांना वाटते की गुन्हेगारांचा समाजावर वचक आहे, त्यामुळे त्यांना मते मिळू शकतात. यामध्ये पोलीस काय करू शकतात? गळ्यापर्यंत आल्यानंतरच राजकारण्यांना जाग येते. आता तर मी ऐकतो की राजकारणी गुंडांशी संगनमत करतात आणि त्यांच्यासाठी मालमत्ता खरेदी करतात."

एम.एन. सिंग यांनी एकेकाळी ज्या पोलिस दलाचं नेतृत्व केलं होतं त्याच दलातील काही अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवणे आणि एका व्यावसायिकाची हत्या केल्याप्रकरणी दोन एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिसांना अटक करण्यात आलेल्या कुप्रसिद्ध अँटिलिया प्रकरणाचा संदर्भ देत सिंग म्हणाले की, "मुंबई पोलिसांच्या इतिहासात यापेक्षा लज्जास्पद घटना घडलेली नाही. मुंबई पोलिसांचे ब्रीदवाक्य हे चांगल्याचे रक्षण आणि वाईटाला संपवायचे आहे. परंतु या प्रकरणात पोलिसांनी विरोधाभास दाखवला. एका निष्पापाचा बळी गेला. मी फक्त मुंबई पोलिसांच्या वतीने माफी मागू शकतो. राजकारण्यांचा सहभाग असताना अशा गोष्टी घडतात. त्यात सुधारणा करण्यासाठी पोलिसांना राजकीय नियंत्रणातून बाहेर काढले पाहिजे."

ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले की, दीक्षित यांच्या पुस्तकात गेल्या तीस वर्षांत मुंबईत घडलेल्या अनेक रंजक गोष्टींची माहिती मिळते. प्रमोद महाजन खून प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यापर्यंत जितेंद्र दीक्षित पोहोचू शकले. तपास पूर्ण होताच त्या तपास अधिकाऱ्याने राजीनामा दिला. प्रवीण महाजन यांनी त्यांच्या भावाला गोळ्या घातल्या, त्यावेळची नेमकी परिस्थिती या पुस्तकातून स्पष्ट होते." 

लॅबिरिंथ लिटररी एजन्सीचे संस्थापक अनिश चंडी म्हणाले की, एका रात्री डोंगरी, नागपाडा आणि मोहम्मद अली रोड सारख्या भागात फिरायला गेल्यानंतर हा विषय दीक्षित यांच्या डोक्यात आला आणि त्यांनी तो सत्यात उतरवला. गेल्या काही दशकात या भागात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडतात. 

अभिनेता आणि माजी पत्रकार चारुल मलिक यांनी 12 डिसेंबर 2022 रोजी मुंबई प्रेस क्लबमध्ये या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी पत्रकार, पुस्तक प्रेमी आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?Job Majha : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 26 March 2025Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
Embed widget