एक्स्प्लोर

केंद्राने पाठवलेली चणाडाळ गोदामात पडून सडली, राज्यात एक हजार टन डाळ खराब; आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप

मागील वर्षी लॉकडाऊन काळात केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाठवलेली चणाडाळ राज्यातील गोदामात तशीच पडून राहिल्याने सडली, असा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. राज्यात अशाप्रकारे 1000 टन चणाडाळ खराब झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मुंबई : केंद्र सरकारने राज्याला पाठवलेली सुमारे एक हजार टन चणाडाळ सरकारच्या गोदामात, दुकानात पडून सडल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. या डाळीचे सर्वसामान्य जनतेला फेरवाटपाचे निर्देश वेळेत दिले गेले असते तर आज कित्येक परिवाराला त्याचा लाभ मिळाला असता. या डाळ नासाडीबाबत हलगर्जीपणा केल्याबाबत तातडीने चौकशी करावी आणि संबंधित मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही मिहीर कोटेचा यांनी केली आहे.

2020 मध्ये भारतासह राज्यात कोविड-19 चा प्रार्दुभाव वाढत गेल्याने त्यावर नियत्रंण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. या काळात अनेक नागरिकांचे रोजगार गेले, तसंच अनेकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं होतं. त्यातच संकटकाळात केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना' अंतर्गत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गोरगरीब जनतेला मोफत वाटण्यासाठी धान्य पाठवले होते. त्यात प्रति कुटुंबासाठी एक किलो चणाडाळही मोठ्या संख्येने पाठवली होती. केंद्र सरकारकडून आलेलं धान्य पात्र शिधापत्रिकांना वाटप झाल्यानंतर ज्या नागरिकांनी धान्य घेतलं नाही ते राज्य सरकारच्या गोदामात, दुकानात तसेच पडून राहिले आणि ही डाळ आता सडून गेलेली असून किडे लागलेल्या स्थितीत आहे. 

मुंबई उपनगरात केंद्र सरकारकडून आलेली 300 टन चणाडाळ शासनाच्या गोदामात, दुकानात विनावाटप पडून असून त्यातील बहुतांश: डाळीची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आहे. त्यात अक्षरशः किडे पडले असून वापरण्यायोग्य राहिलेली नाही. राज्यात अशाप्रकारे 1000 टन चणाडाळ खराब झाली आहे, असा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget