MLA Geeta Jain slapped engineer: आमदार गीता जैन यांनी अनधिकृत बांधकाम तोडणाऱ्या अभियांत्याच्या मुस्काटात लगावली
MLA Geeta Jain slapped engineer: मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी अनधिकृत बांधकाम तोडणा-या अभियंत्याला थोबाडीत मारल्याची घटना मोबाईल मध्ये कैद झाली आहे.
MLA Geeta Jain slapped engineer: सध्या वाढत्या अनधिकृत बांधकामाला (unauthorized construction) जरब बसवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. पण मीरा भाईंदरमध्ये याचसंदर्भातलं एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करायला गेलेल्या अभियंत्यांना दम दाटी केल्याचं दृश्य यावेळी कॅमेरामध्ये कैद झालं. मंगळवारी (20 जून) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास प्रभाग क्रमांक 6 येथे काशिमीरातील पेणकर पाडा येथे पालिकेतर्फे अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली.
यावेळी पालिकेने हे बांधकाम का तोडलं असा सवाल त्यांनी केला. कारण हे बांधकाम म्हणजे एका महिलेचं घर होतं. तसेच पावसाळ्यात आता तिला आणि तिच्या लहानग्यामुलाला भर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तिचं घर का तोडलं असा सवाल गीता जैन यांनी यावेळी बांधकामावर कारवाई करण्यासाठी आलेल्या अभियंत्यांना विचारला. या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच या अभियंत्याने अगदी उशिरापर्यंत गीता जैन यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार केली नसल्याची माहिती समोर येत आहे.
गीता जैन यांचे स्पष्टीकरण
यावर गीता जैन यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. तसेच त्यांनी या अभियंत्यांवर हात उचलल्याची कबुली देखील दिली. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, पालिकेचे अभियंता शुभम पाटील आणि संजय सोनी यांनी बांधकाम का तोडलं असा सवाल केला. कारण हे घरं एका महिलेचं होतं. ज्यामध्ये ती तिच्या लहान मुलासोबत राहत होती. भर पावसाळ्याच्या दिवसांत तिला रस्त्यावर का काढले असा सवाल त्यांना केला असता त्यावर अभियंता हसत होता. त्यामुळे एका महिलेचा अपमान सहन न झाल्यानं गीत जैन यांनी अभियंत्यांवर हात उचलल्याचं कबूल केलं.
गीता जैन यांनी या अभियंत्याचे शर्ट खेचून त्याच्या मुस्काटात लगावली. तसेच त्याला दमदाटी केल्याचं देखील कॅमेरामध्ये कैद झालं आहे. त्यामुळे गीता जैन यांच्या वागण्याचे समर्थन आता प्रशासन करणारा का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच अभियंता महिलेवर हसत असल्याचा आरोप देखील यावेळी गीता जैन यांनी केला. तर सुरुवातीला संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचं देखील गीता जैन यांनी म्हटलं. परंतु अभियंता महिलेवर हसल्याची गोष्ट सहन न झाल्याचं गीता जैन यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
1 जुलैला ठाकरे गटाचा मुंबई मनपावर विराट मोर्चा; आदित्य ठाकरे नेतृत्व करणार