एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत घोळ, काँग्रेसचा गंभीर आरोप
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी काही आक्षेपांच्या आधारे निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. वार्डरचना आणि मतदारयाद्यांच्या प्रारुप आणि अंतीम आराखड्यात फरक असल्याचा दावा करत काँग्रेसनं निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.
मुंबई महापालिकेसाठी बनवण्यात आलेल्या मतदारयाद्यांमध्ये मतदार संख्या आणि लोकसंख्या यामध्येही तफावत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. तसंच मतदारांची माहितीही पूर्ण नसल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
काय आहेत काँग्रेसचे आक्षेप?
- वॉर्डरचना आणि मतदारयाद्यांच्या प्रारुप आणि अंतीम आराखड्यात फरक असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. अंतीम आराखड्यात आणि प्रारुप आराखड्यात नसलेल्या चूकीच्या माहितीचा समावेश असल्याचंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
- मतदारसंख्या आणि लोकसंख्या यांचं व्यस्त प्रमाण
- मतदारांचे पूर्ण पत्ते आणि फोटो यांची माहिती मतदारयादीत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement