एक्स्प्लोर
फोडाफोडी केली नाही, विश्वासाने 'ते' शिवसेनेसोबत : उद्धव ठाकरे
मागे जनता पक्षाची लाट आलेली होती, अनेक जण बुडाले पण शिवसेना आहे तशीच होती, आता खूप पुढे गेली आहे' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला आहे.
मिरा भाईंदर : आम्ही फोडाफोडी केलेली नाही, लोक विश्वासाने आले आहेत, असं सांगत मिरा भाईंदरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
'आम्ही फोडाफोडी केली नाही. हे लोक विश्वासाने आले आहेत. लाटा येतात आणि जातात, मागे जनता पक्षाची लाट आलेली होती, अनेक जण बुडाले पण शिवसेना आहे तशीच होती, आता खूप पुढे गेली आहे' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला आहे. भाजपनं बाहेरच्या लोकांना संधी दिली, बाहेरुन आलेली लोकं भरली आहेत, असंही उद्धव म्हणाले.
ईव्हीएम मशीनवर लक्ष द्या, धनुष्य बाणासमोर बटन दाबले की लाईट पेटते का ते बघा, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला. ईव्हीएम मशीन हा लोकशाहीचा अपमान आहे. आम्ही म्हणतो, पेपर आणा तर नाही म्हणतात. वेळ लागतो. मग विद्यापीठाचे निकाल का उशिरा लागतात? असा बाणही उद्धव ठाकरेंनी सोडला.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :
विद्यापीठाचा विषय मुख्यमंत्री अंगाला लावून घेत नाही, मग कोण घेणार, शिक्षण मंत्री कशाला देता?
नोटाबंदी करुन काळ पैसा घालवला, मग निवडणुकीत पैसे वाटतात तो रंग कुठला आहे?
आम्हाला पैसे वाटण्याची गरज लागत नाही. पक्ष फोडायला पैसे आहेत, लोक फोडायला पैसे आहेत. गोरखपूरमध्ये मुलं तडफडून मेली, मतं घ्यायला पैसे आहेत पण ऑक्सिजन घ्यायला पैसे नाहीत.
26/11 च्या हल्ल्यानंतर आर आर पाटील यांनी जे वक्तव्य केलं, त्यानंतर त्यांना पदावरुन जावं लागलं होतं, मग
उत्तर प्रदेशात जे बोलतात त्याचं काय?
एकाही रस्त्यावर खड्डे पडले नाहीत, पाणी साचलं नाही. कामं होण्याआधीच भ्रष्टाचार झाला अशी बोंब मारतात. आम्ही पेंग्विन आणले दुर्दैवाने त्यातला एक मेला आणि बोंब सुरु झाली. माझ्या जनतेनं पेंग्विन बघायचे नाहीत का?
बोरीवलीपर्यंतची मेट्रो मिरा भाईंदरपर्यंत आणली. हे काम शिवसेनेनं केलं आहे. पाण्याचा प्रश्न, आरोग्य सेवा नाही. एका नाट्यगृहाचा प्रश्न विचारायचे, आणि मत देऊन मोकळं व्हायचं
500 फुटांच्या घरांचा मालमत्ता कर आम्ही माफ करणार. ही गोष्ट सरकारकडे असते, पण आम्ही करुन घेणार. आम्ही वाट बघतोय सरकार आम्हाला कधी 'नाही' म्हणत आहे याची.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement