एक्स्प्लोर

हक्काचं दालन न मिळाल्याने यड्रावकरांची मंत्रालयातील दालनात घुसखोरी

हक्काचं दालन मिळत नसल्याने चक्क राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या दालनाचा अवैधरित्या ताबा घेतला. विधानभवनात मिळालेलं तात्पुरतं दालन अधिवेशनामुळे रिकामं करण्याची नोटीस मिळाल्याने यड्रावकर चांगलेच हैराण झाले होते.

मुंबई : हक्काचं दालन मिळत नसल्याने मंत्र्यांनी थेट मंत्रालयातील दालनात घुसखोरी केल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंत्रालयातील सांस्कृतिक कार्य विभागाच्या दालनाचा अवैधरित्या ताबा घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप दालनाचं वाटप न झाल्याने राज्यमंत्र्यांनी घुसखोरी केली आहे.

राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या या कृतीमुळे सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली आहे. राज्यमंत्र्यांनी दालन ताब्यात घेतल्यामुळे उपसचिवांवर सचिवांच्या दालनात बसण्याची वेळ आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचं दालन मंत्रालयातील सातव्या मजल्यावर आहे. विधानभवनात मिळालेले तात्पुरते दालन अधिवेशनामुळे रिकामं करण्याची नोटीस मिळाली होती. आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य खातं असल्याने लोकांना भेटण्यास व्यत्यय येत होता. त्यामुळे मंत्रालयातील सातव्या मजल्यावर सांस्कृतिक कार्य विभागाच्या दालनाचा ताबा घेतला, अशी कबुली राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

कोण आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर? राजेंद्र पाटील यड्रावकर हे कोल्हापुरातील शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तब्बल 90 हजार 38 मतं मिळवून, शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांचा 27 हजार 824 मतांनी पराभव केला. निकालानंतर यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं.

राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 14 जानेवारी 2020 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. विधानभवनातील दुसरा मजल्यावरील दालन क्र. 214 ब हे त्यांचं कार्यालय आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget