एक्स्प्लोर

Anil Parab:  ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत भर; ईडीनंतर आता म्हाडा कारवाई करणार?

Anil Parab:  शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल परब यांचे वांद्रे येथील कार्यालयावर म्हाडा कारवाई करण्याची शक्यता आहे.

Anil Parab:  राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Faction) नेते अॅड. अनिल परब (Anil Parab) यांना आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. बुधवारी ईडीने (ED) साई रिसॉर्ट (Sai Resort) प्रकरणी 10 कोटींच्या संपत्तीवर तात्पुरती टाच आणल्यानंतर आता म्हाडादेखील (Mhada) कारवाई करण्याची शक्यता आहे. वांद्रे येथील अनिल परब यांच्या कार्यलयावर म्हाडाकडून हातोडा चालवण्यात येण्याची शक्यता आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे वांद्रे परिसरातील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 57 आणि 58 या ठिकाणी कार्यालय आहे. हे जनसंपर्क कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात यावे अशा आशयाचे पत्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हाडाला दिले आहे.  या प्रकरणात काही वर्षांपूर्वी किरीट सोमय्या यांनी हे कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्याची मागणी करणारी याचिका लोकायुक्तांपुढे सादर केले होती. त्यापूर्वी  विलास शेगले या व्यक्तीने देखील म्हाडाकडे तक्रार करून हे बांधकाम पाडण्यात यावं अशी मागणी केली होती. 

या तक्रारीनंतर म्हाडाच्या मिळकत व्यवस्थापकांनी अनिल परब यांना 27 जून व 22 जुलै 2019 रोजी दोन वेळा नोटीस बजावून बांधकाम पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्यावेळी अनिल परब यांना बांधकाम पाडलं नाही. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. त्या दरम्यानच्या काळात 'म्हाडा'कडून ते बांधकाम पाडण्यात आले नव्हते. 

दरम्यानच्या काळात अनिल परब यांच्यावतीने हे बांधकाम अधिकृत करण्यात यावं अशा पद्धतीचा प्रस्ताव म्हाडाला देण्यात आला होता. मात्र म्हाडाने हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यानंतर आता सरकार बदलल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा हे बांधकाम पाडण्यात यावं अशा पद्धतीचे पत्र म्हाडाला लिहिल आहे. त्यामुळे या पत्रानंतर म्हाडाकडून काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

ईडीकडून परब यांच्यावर कारवाई 

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आलीय. ईडीने दिलेल्या माहितीनुसार 10. 20 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीय. ईडीने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. मात्र, या मालमत्तेशी आपला काहीही संबंध नसल्याचे अॅड. अनिल परब यांनी म्हटले होते. 

Anil Parab Mhada Office : मुंबईतील म्हाडातील परबांचं कार्यालय अनधिकृतच,अर्जही म्हाडाने फेटाळले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Bhavesh Bhinde : अपक्ष उमेदवार ते आरोपी, घाटकोपर  दुर्घटनेतील भावेश भिंडे नेमका कोण?Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलंGhatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 24 तास, बचावकार्य अजूनही सुरुच!Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 14 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Embed widget