(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईकरांनो सावधान! पुढील 24 ते 36 तास महत्वाचे, पावसाचा जोर अधिक वाढणार
पुढील 24 ते 36 तासात मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 18 आणि 19 जुलै हा मुंबईसाठी अधिक पावसाचा असणार आहे. कारण, त्याला पश्चिमेकडील वाऱ्यांचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे.
Mumbai Rain News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. सध्या कुठं जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळतोय, तर कुठं ढगाळ वातावरण (Weather) असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत (Mumbai) पावसानं उघडीप दिली आहे. शिअर झोनच्या प्रभावामुळे मुंबईत गेल्या 2 दिवसांत पाऊस पडला नाही, आता तो उत्तरेकडे सरकल्याने आज दुपार-संध्याकाळपासून पुढील 24-36 तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. 18,19 जुलै हा मुंबईसाठी अधिक पावसाचा असेल कारण त्याला पश्चिमेकडील वाऱ्यांचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे असा अंदाज हवामान तज्ज्ञ ऋषिकेश आग्रे यांनी व्यक्त केला आहे.
आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पावासचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरबोर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं आज कोकणसह मध्य महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस
अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी या पावसाचा फटका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गावाला देखील बसला आहे. मिटकरी यांच्या गावचा संपर्क तुटला आहे. काल रात्री आणि आज पहाटेच्या कुटासा परिसरात धुवाधार पाऊस झाला. त्यामुळ अकोला आणि कुटासा गावाला जोडणारा रस्ता बंद झाला आहे. या रस्त्यावरील लवकी नाल्याला पुर आल्याने कुटासा गावचा संपर्क तुटला आहे. कुटासा हे गाव आमदार अमोल मिटकरींचं गाव आहे. या नाल्याला आलेल्या पूरामूळ शेतकऱ्यांच्या शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ही यात झालंय.आज सकाळी वाहतूक सुमारे काही तासांसाठी प्रभावित झाली होती. मात्र आता काहिस नाल्याचं पाणी कमी झालेय. पुढील दीड तासात रस्ता खुला होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: