एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाळासाहेबांच्या पहिल्या स्मारकाचं अनावरण
कल्याण (ठाणे) : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या स्मारकाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. कल्याणमधील काळा तलाव परिसरात बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यात आलं आहे.
कल्याणमध्ये शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी निवडणूक आयोगानं विशेष परवानगी दिली होती.
देशात काळ्याचं पांढरं होतं आहे. मात्र आम्ही काळा तलाव भगवा करून दाखवला अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला उद्देशून खोचक प्रतिक्रिया दिली.
बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते. तसंच शिवसैनिकांनी देखील काळा तलाव परिसरात मोठी गर्दी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement