एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत आज पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक
मुंबईत पश्चिम रेल्वेवर आज सकाळी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईत पश्चिम रेल्वेवर आज सकाळी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. दरम्यान आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर कोणताही मेगाब्लॉक नसेल.
पश्चिम रेल्वेवर आज सांताक्रूझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक अप आणि डाऊन अशा दोन्ही स्लो मार्गांवर असणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन स्लो मार्गावरील गाड्या फास्ट मार्गावरुन चालवण्यात येणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावेल. आज मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही, त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिऴणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement