एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत पश्चिम आणि ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेवर विशेष पॉवर ब्लॉक
मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावर पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच मध्य रेल्वेवर परेल स्थानकात अप फास्ट मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर रेल्वेमार्गावर कोणताही मेगाब्लॉक आज घेण्यात येणार नाही
मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावर पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच मध्य रेल्वेवर परेल स्थानकात अप फास्ट मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर रेल्वेमार्गावर कोणताही मेगाब्लॉक आज घेण्यात येणार नाही
मध्य रेल्वेवरील परेल स्थानकात ब्रिजच्या कामासाठी सकाळी 08.30 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत अप फास्ट मार्गावरील वाहतूक माटूंगा ते भायखळा स्थानकांदरम्यान बंद असेल. तसंच ट्रान्सहार्बरवर ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 04.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तसंच पश्चिम रेल्वेवरही बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर परेल स्थानकात ब्रिजच्या कामासाठी आज सकाळी 08.30 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे माटुंगा ते भायखळा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावरील वाहतूक अप स्लो मार्गावरुन वळवण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेमार्गावर बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूक स्लो मार्गावर वळवण्यात आली आहे.
हार्बर रेल्वे
आज हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसेल.
ट्रान्सहार्बर रेल्वे
ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान आज सकाळी 11.10 ते दुपारी 04.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे मेगाब्लॉकच्या काळात ट्रान्सहार्बरची वाहतूक बंद असेल. प्रवाशांना हार्बर आणि मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवरुन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement