Railway Megablock | पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक
पश्चिम रेल्वेवरील वसई ते भाईंदर स्थानकादरम्यान, मध्य रेल्वेवर भायखळा आणि विद्याविहार आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान, पश्चिम रेल्वेवर भाईंदर-वसई रोड स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकमुळे लोकलसेवा उशीराने असणार आहे. तर हार्बर मार्गावरील काही लोकल मेगाब्लॉकदरम्यान रद्द करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर वसई ते भाईंदर या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान बोरीवली ते विरारदरम्यान धीम्या लोकल जलद मार्गावर धावतील.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर भायखळा आणि विद्याविहार स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.42 पासून दुपारी 3.44 वाजेपर्यंत धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान कल्याण दिशेकडे जाणाऱ्या धीम्या लोकल भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील. ब्लॉकदरम्यान चिंचपोकळी, करी रोड येथे लोकल थांबणार नाहीत.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेवर सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/ पनवेलकडे जाणारी लोकल सेवा बंद राहील. सकाळी 10.34 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी 10.21 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पनवेल/सोलापूर/वाहन सीएसएमटीकडे एकही लोकल धावणार नाही. या दरम्यान सीएसटी कुर्ला आणि वाशी-पनवेल यादरम्यान विशेष लोकल धावतील.