एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत आज मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक
मुंबईतील रेल्वेच्या मुख्य लाईनवर अर्थातच मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तसंच हार्बर मार्गावरही दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाईल. सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल.
मुंबई : मुंबईतील रेल्वेच्या मुख्य लाईनवर अर्थातच मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तसंच हार्बर मार्गावरही दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाईल. सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल.
मेगाब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेवर दिवा ते कल्याण स्टेशनदरम्यान डाऊन फास्ट आणि हार्बर रेल्वेमार्गावर सीएसटी के चुनाभट्टी आणि माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाईल. या वेळेत रेल्वेलाईनच्या डागडुजीची कामं केली जातील.
दरम्यान पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. उद्या सोमवारी मध्यरात्री हा पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाईल.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर दिवा ते कल्याण स्टेशनदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर आज सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या वेळेत दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुऴे या स्थानकांदरम्यानची वाहतूक डाऊन स्लो मार्गावरुन वळवण्यात आली आहे. या मार्गावरील लोकल जवळपास 20 मिनिटं उशिरानं धावतील.
सीएसटीसाठी ठाणे स्टेशनमधून अप फास्ट मार्गावर सुटणाऱ्या सर्व लोकलना सकाळी 10.46 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबा दिला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील गाड्या किमान 15 मिनिटं उशिरानं धावणार आहेत. ब्लॉकमध्ये सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या स्लो मार्गावरील लोकल गाड्या 10 मिनिटं उशिरानं धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेमार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 पर्यंत हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 9.52 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत. तसेच सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानच्या अप आणि डाऊन फेऱ्या सकाळी 10.38 ते दुपारी 4.13 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर सोमवारी मध्यरात्री ब्लॉक
आज रविवारी पश्चिम रेल्वेमार्गावर नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्याऐवजी सोमवारी 31 जुलै रोजी मध्यरात्री वांद्रे टर्मिनस यार्डामध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
क्रीडा
निवडणूक
Advertisement