एक्स्प्लोर

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वेमार्गांवर आज ट्रॅकची दुरुस्ती आणि विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवरील वाहतूक उशिरानं धावणार आहे.

मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वेमार्गांवर आज ट्रॅकची दुरुस्ती आणि विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवरील वाहतूक उशिरानं धावणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन स्लो मार्गांवर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. तर हार्बर रेल्वे मार्गांवर नेरुळ ते पनवेल अप आणि डाऊन स्लो मार्गांवर मेगाब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवरही अंधेरी ते बोरीवली डाऊन आणि अप फास्ट मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाईल. मध्य रेल्वे  मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन स्लो लाईनवर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.  त्यामुळे सकाळी 10.48 ते दुपारी 4.23 मुलुंडहून सुटणाऱ्या सर्व डाऊन स्लो वरील लोकल कल्याणपर्यंत फास्ट ट्रॅकवरुन चालवण्यात येतील. या लोकल फक्त ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्टेशनवर थांबतील. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं धावेल. डाऊन स्लो मार्गांवरील लोकल कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्टेशनवर थांबणार नाहीत. या स्थानकांवरील प्रवाशांना अप दिशेनं दिवा, डोंबिवली आणि कल्याणवरुन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान सकाळी 10.20 ते दुपारी 2.42 या वेळातील सीएसएमटीवरुन सुटणाऱ्या डाऊन फास्ट मार्गावरील सर्व लोकल्स घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि 15 मिनिटे उशिराने धावतील. अप फास्ट मार्गावरील सकाळी 11.00 ते दुपारी 03.08 वाजेपर्यंत कल्याणवरुन सुटणाऱ्या सर्व लोकल्स दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील.  त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिरानं धावेल. हार्बर रेल्वे हार्बर रेल्वेमार्गावर नेरुळ ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे सकाळी 11.14 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत पनवेल आणि बेलापूरवरुन सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या सर्व लोकल आणि नेरुल ते पनवेल आणि बेलापूरसाठी सुटणाऱ्या सर्व डाऊन हार्बर लोकल आज रद्द असतील. सकाळी 11.04 ते दुपारी 03.53 वाजेपर्यंत पनवेल आणि बेलापूरवरुन ठाण्यासाठी सुटणाऱ्या लोकल आणि सकाळी 11.42 ते दुपारी 04.04 वाजेपर्यंत नेरुळ ते पनवेल आणि बेलापूरसाठी सुटणाऱ्या सर्व ट्रान्सहार्बर लोकल रद्द असतील. ब्लॉकच्या काळात पनवेल ते अंधेरी सेवा लोकलबंद असेल. तसंच सीएसएमटी-नेरुळ आणि ठाणे नेरुळ मार्गांवर विशेष लोकल चावलण्यात येतील. पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वेवरही आज अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर सकाळी 10.35 ते दुपारी 15.35 जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ब्लॉकच्या काळात सर्व अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील लोकल अंधेरी ते बोरीवली दरम्यान स्लो मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावेल.

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget