एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO | गाण्याच्या तालावर ठेका, चुंबनही घेणारा, बोलणारा ‘हा’ पोपट पाहिला का?
फ्रान्सिस कुटुंबाने स्नाइपरबरोबर खेळण्यासाठी 'एलेक्झा' हि यंत्रणा आणली आहे. त्यामुळे हा पोपट टेक्नोसॅव्हीदेखील झाला असून तो आता एलेक्साला कमांड देतो आणि हवे ते गाणे लावतो.
मुंबई : आत्तापर्यंत तुमच्या आमच्या घरात राहणारा पोपट हा मीठू मीठू करताना पाहिला असेल पण मुंबईच्या चांदीवली भागात राहणारा हा पोपट चक्क माणसासारखा बोलतोसुद्धा आणि नाचतोसुद्धा. तर माणसे वापरत असलेले तंत्रज्ञानही वापरतो. त्यामुळेच हा पोपटसध्या कौतुकाचा आणि आश्चर्याचा विषय बनला आहे.
शिजिन फ्रान्सिस यांच्या घरात राहणाऱ्या पोपटाचे नाव ‘स्नाइपर’ असून हा आफ्रिकन ग्रे प्रजातीचा आहे. माणसासारखा बोलणारा, गाण्याच्या तालावर ठेका धरणारा, एखाद्याच्या हातावर टाळी देणारा एवढच नाही तर चुंबनही घेणारा हा मल्टीटास्कींग पोपट फ्रान्सिस यांच्या पत्नीला त्यांच्या नातेवाईकाने दिला होता. तेव्हा तो केवळ तीन महिन्याचा होता. आता तो दीड वर्षांचा झाला आहे.
VIDEO | असा पोपट पाहिला नसेल... | मुंबई | एबीपी माझा
फ्रान्सिस कुटुंबाने स्नाइपरबरोबर खेळण्यासाठी 'एलेक्सा' हि यंत्रणा आणली आहे. त्यामुळे हा पोपट टेक्नोसॅव्हीदेखील झाला असून तो आता एलेक्झाला कमांड देतो आणि हवे ते गाणे लावतो. एवढंच नाही तर घरातील सदस्यांना फोन देखील लावतो. असा हा मल्टीटास्कींग ‘स्नाइपर’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
राजकारण
क्राईम
Advertisement