एक्स्प्लोर
वैद्यकीय शिक्षणात आरक्षण नाही, मराठा विद्यार्थ्यांचे सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलन
मराठा समाजातले वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आज मुंबईत निदर्शने करत आहेत. वैद्यकीय शिक्षणात आरक्षण न मिळाल्याने या विद्यार्थांनी आंदोलन सुरु केले आहे.
मुंबई : मराठा समाजातले वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आज मुंबईत निदर्शने करत आहेत. वैद्यकीय शिक्षणात आरक्षण न मिळाल्याने या विद्यार्थांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जमून निषेध आंदोलन सुरु केले आहे.
30 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू करण्यात आले. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निकालानुसार आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
VIDEO | वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचं सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलन | मुंबई | एबीपी माझा
मराठा आरक्षण लागू होण्याआधी म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटिफिकेशन आले होते, त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या मराठा आरक्षणाचा लाभ मेडिकल क्षेत्रातील मराठा विद्यार्थांना घेता येणार नाही, असे कारण कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement