एक्स्प्लोर
'TISS' मध्येही 'मी टू', विद्यार्थिनीचा प्राध्यापकावर आरोप
मुंबईतील झेवियर्स महाविद्यालयानंतर 'मी टू' मोहिमेत आता 'टीस' ( टाटा इंस्टिस्ट्यूट ऑफ सोशल सायन्स) संस्थेचं नाव समोर आलं आहे. 'टीस'ची माजी विद्यार्थिनी प्रीती कृष्णन हिने संस्थेतील प्राध्यापक पी. विजयकुमार यांच्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे. याबाबत प्रीती कृष्णन हिने काल तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत फेसबुक पोस्ट लिहून 'मी टू' मोहिमेत घडलेला प्रकार समोर आणला आहे.

मुंबई: मुंबईतील झेवियर्स महाविद्यालयानंतर 'मी टू' मोहिमेत आता 'टीस' ( टाटा इंस्टिस्ट्यूट ऑफ सोशल सायन्स) संस्थेचं नाव समोर आलं आहे. 'टीस'ची माजी विद्यार्थिनी प्रीती कृष्णन हिने संस्थेतील प्राध्यापक पी. विजयकुमार यांच्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे. याबाबत प्रीती कृष्णन हिने काल तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत फेसबुक पोस्ट लिहून 'मी टू' मोहिमेत घडलेला प्रकार समोर आणला आहे.
प्रीती कृष्णन 2004 -2006 या काळात 'टीस' संस्थेत मास्टर ऑफ आर्टस् चा शिक्षण घेत असताना पी.विजयकुमार यांनी प्रबंध तयार करतेवेळी मार्गदर्शक म्हणून प्रीती कृष्णन सोबत काम केलं होतं.
या काळात त्यांनी मला एकेदिवशी स्वतःच्या घरी नेऊन चुंबन घेण्याची जबरदस्ती केली शिवाय या काळात त्यांनी अनेकदा माझ्या सोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप प्रीतीने लिहलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये केला आहे. मात्र, त्यावेळी आपण घाबरलो होतो, शिवाय दबाव असल्याने हे प्रकरण मी त्यावेळी समोर आणलं नसल्याचा मला खेद आहे, असं देखील प्रीतीने फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे.
'मी टू' मोहिमेमुळे मला एक धाडस मिळालं आणि त्यामुळे मी हा प्रकार लिहिल्याचं प्रीतीने सांगितलं आहे. शिवाय हा प्रकार इतर मुलीसोबत होऊ नये आणि झाल्यास त्यांनी हा प्रकार न घाबरता समोर आणावा, असंही तिने सांगितलं आहे. याबाबत 'टीस'चे प्राध्यापक पी.विजयकुमार यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नसून 'टीस' व्यवस्थापन याबाबत चौकशी करत असल्याचे संस्थेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
