एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मॅकडोनल्ड्समध्ये भारतीय चव, मसाला डोसा बर्गर ते अंडा भुर्जी
मुंबई : 'आय अॅम लव्हिन् इट!' अशी टॅगलाईन असलेलं मॅकडोनल्ड्स हे चेन रेस्टॉरंट बर्गर आणि फ्राईजने भारतीयांच्या जिभेचे चोचले पुरवतात. मात्र आता या पाश्चात्य बर्गरमध्ये भारतीय चव सामावणार आहे. मॅकडी लवकरच मसाला डोसा ते अंडा भुर्जी असं वैविध्य असलेले बर्गर्स आणण्याच्या तयारीत आहे.
मॅकडीच्या क्रांतिकारी मेन्यूने तरुणवर्गाला ब्रेकफास्टमध्ये पर्यायांची विविधता मिळणार आहे. सकाळच्या वेळेत ग्राहकांना खेचून आणण्यासाठी हा बदल करण्याचा कंपनीचा मानस आहे. मोलगा पोडी सॉस असलेले मसाला डोसा बर्गर, अंडा बुर्जी हे पदार्थ मॅकडोनल्ड्सच्या मेन्यूकार्डमध्ये पाहायला मिळतील.
येत्या वीकेंडला नवा मेन्यू मॅकडीमध्ये दिसण्याची चिन्हं आहेत. सुरुवात मुंबईपासून होईल, त्यानंतर हळूहळू देशभरातील मॅकडीच्या आऊटलेट्समध्ये हा 'नाश्ता' मिळेल. सोबक स्पिनच आणि कॉर्न ब्रोशे, प्लेन किंवा मसाला स्क्रॅम्बल्ड एग्ज, वॅफल्स, हॉटकेक्स हे पदार्थही ब्रेकफास्टला मिळतील. आरोग्यदायी न्याहारीसाठी तळलेल्या पदार्थांऐवजी ग्रिल्ड मेन्यू असेल.
भारतीय ब्रेकफास्ट मार्केट काबीज करण्याचा हा प्रयत्न नसल्याचंही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. उडुपी किंवा इराणी रेस्टॉरंटशी ही थेट स्पर्धा नाही. मॅकडीमध्ये डोसा विकला जाणार नसून, त्या फ्लेव्हरचे बर्गर असतील, असं सांगण्यात आलं आहे. केएफसी, पिझा हट, बर्गर किंग, डॉमिनोज यासारख्या प्रतिस्पर्ध्यांना मात्र मॅकडीने आव्हान दिलं आहे. यापूर्वी डॉमिनोजने नवरात्रीच्या काळात उपवासाचे पिझा बाजारात आणले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
रायगड
बॉलीवूड
सोलापूर
Advertisement