एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईचे महापौर राणीच्या बागेतील बंगल्यात राहणार
त्यामुळे आधी राणीच्या बागेतील बंगला महापौर निवास्थानाला साजेसा नाही असं म्हणत विरोध करणाऱ्या शिवसेनेने आता प्रशासनासमोर नमतं घेतल्याचं दिसत आहे.
मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अधिकृत घराचा शोध अखेर संपला आहे. महापौरांवर भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतील बंगल्यात जाण्याचा निर्णय घेतला. महापौर निवासात मंगळवारी विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कमधल्या महापौर बंगल्याची जागा देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसातच या स्मारकाच्या भूमीपूजनाचं कामही होणार आहे. "सर्व परवानग्या मिळाल्याने आता स्मारकासाठीच्या उभारणीत कोणहीती अडचण येणार नाही. त्यामुळे शिवाजी पार्कमधील महापौर निवास सोडून प्रशासन जिथे देईल त्या बंगल्यात जाण्याचा निर्णय मी घेतला आहे," असं महाडेश्वर म्हणाले.
महापौर बंगला
महापौर बंगल्यासाठी मलबार हिल इथला अतिरिक्त आयुक्तांचा बंगला आणि राणी बागेतील उद्यान अधीक्षकांचा बंगला हे शेवटचे दोन पर्याय उरले होते. परंतु मलबार हिलमधील बंगल्याच्या ठिकाणी जलाशयाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने तो बंगला तोडावा लागू शकतो. त्यामुळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांसमोर राणीच्या बागेतील बंगल्यात जाण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. राणीच्या बागेतील या बंगल्याची प्रशासनाने डागडुजीही करुन घेतली आहे.
त्यामुळे आधी राणीच्या बागेतील बंगला महापौर निवास्थानाला साजेसा नाही असं म्हणत विरोध करणाऱ्या शिवसेनेने आता प्रशासनासमोर नमतं घेतल्याचं दिसत आहे. सध्या राणीच्या बागेतील बंगल्यात अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड हे राहतात.
नोव्हेंबर 2016 मध्ये महापौर निवासात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यानंतर शिवसेना नगरसेवकांनी कोणत्याही चर्चेशिवाय मागील वर्षी फेब्रुवारी 2017 मध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement