एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करा;BMC चे मुंबईकरांना आवाहन

Maratha Reservation :  23 जानेवारी 2024 पासून मुंबईत मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू होणार आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी हे सर्वेक्षण करणार असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Maratha Reservation Survey :  मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे राज्य सरकारच्या निर्देशानंतर आता मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी (Maratha Backwardness Survey) वेग आला आहे. या सर्वेक्षणासाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. मुंबईत होणाऱ्या सर्वेक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने (BMC) केले आहे.  

मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज मंगळवार 23 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार करण्यात येणारे हे सर्वेक्षण मुंबई महानगरपाल‍िका क्षेत्रात देखील करण्यात येणार असून यासाठी महापालिकेचेदेखील सहकार्य असणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे अध‍िकारी आणि कर्मचारी मुंबई शहर आण‍ि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सर्वेक्षण करणार आहेत. त्यामुळे या प्रशासकीय कामासाठी आपल्या घरी, अपार्टमेंट मध्ये, सोसायटीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा, असे आवाहन मुंबई महानगरपाल‍िका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

राज्यभरात सुरू होणाऱ्या हे सर्वेक्षण मंगळवार (द‍िनांक २३ जानेवारी २०२४) पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू होणार आहे. यासाठी महानगरपाल‍िकेचे अध‍िकारी आण‍ि कर्मचाऱ्यांना प्रगणक आणि पर्यवेक्षकाचे प्रश‍िक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित करण्यात आलेले प्रश्न या प्रगणक व पर्यवेक्षकांकडून नागरिकांना व‍िचारण्यात येणार आहेत. या माध्यमातून आवश्यक ती माहिती गोळा करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रश‍िक्ष‍ित कर्मचारी मंगळवारपासून आपल्या घरी, सोसायटी आण‍ि अपार्टमेंटमध्ये येतील. संबंध‍ित कर्मचाऱ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र असणार आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेच्या कर्मचाऱ्यांना मुंबईकरांनी सहकार्य करावे आण‍ि त्यांना अपेक्ष‍ित असलेली माह‍िती भरून दयावी. ही माहिती मोबाईलफोनवर आधारित एका ॲपमध्ये नोंदविण्यात येणार असून माहिती नोंदविल्यानंतर माहिती देणाऱ्याची स्वाक्षरी देखील ॲप मध्ये जतन केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget