एक्स्प्लोर
मराठा आरक्षणप्रश्नी विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या 'सेवासदन' या निवासस्थानी मध्यरात्री उशिरापर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी विधान भवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या 'सेवासदन' या निवासस्थानी मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी उद्या (शनिवारी) विधान भवनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. हा प्रश्न कोणत्या एका पक्षाचा नाही, त्यामुळे सर्वपक्षीय तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, रावसाहेब दानवे यांच्यासह सुभाष देशमुख, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, रणजित पाटील, बबनराव लोणीकर, गिरीष महाजन हे नेते उपस्थित होते.
मराठा आरक्षणासाठी मॅरेथॉन बैठका, एकीकडे मुख्यमंत्री तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील
त्याआधी, म्हणजे काल रात्री दहा वाजताच्या सुमारास 'वर्षा' निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली होती. 'बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मताचं भाजप सरकार आहे. आरक्षण मिळावं यासाठी भाजप सरकार गेल्या चार वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मागास आयोगाचा अहवाल मागवला आहे' अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. दरम्यान, मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. समाजाचा रोष लक्षात घेऊन विविध पक्षातील आमदारांनी राजीनामे दिले आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
