Breaking News LIVE : शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात सर्व बंद राहणार: उपमुख्यमंत्री अजित पवार
Breaking News LIVE Updates, 19 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
Milkha Singh Death : फ्लाईंग सिख मिल्खा सिंह यांचे निधन
भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे (Athlete Milkha Singh's wife Nirmal Kaur dies of COVID-19) निधन झाले. मिल्खा सिंह फ्लाईंग सिख (Flying Sikh) नावाने प्रसिद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात - राजेश टोपे
राज्यात आज, 19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! महाबळेश्वर, पाचगणी आजपासून सुरु
र्यटकांसाठी आनंदाची बातमी साताऱ्यातून आली आहे. राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी सुरु होणार आहे. शनिवारपासून संपूर्ण महाबळेश्वर पाचगणीचे पर्यटन सर्वांसाठी खुले होणार आहे. पर्यटकांसाठी काही नियम आणि अटी लागू करुन महाबळेश्वर, पाचगणी सुरु करण्याचा निर्णय वाई प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आहे. महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावरच होणार रॅपिड अॅन्टीजेन तपासणी होणार आहे. तर हॉटेल व्यावसायिक कर्मचारी यांना करावी लागणार प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी होणार आहे.
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर येवला येथे बस-अल्टो कारचा अपघात, 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर येवला येथे बस-अल्टो कारचा अपघात, येवल्याच्या रायते गावाजवळ संध्याकाळच्या सुमारास झाला अपघात, कारचे टायर फुटल्याने कार बसवर जाऊन आदळली, जोरदार झालेल्या धडकेने कारमधील 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी
फिरायला गेलेल्या लोकांना 15 दिवस क्वॉरंटाईन करण्याचा विचार: उपमुख्यमंत्री अजित पवार
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, कोल्हापूर या सारख्या जिल्ह्यांमध्ये अजुनही कोरोनाचे बऱ्यापैकी रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधे दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेले 53 टक्के कोरोना रुग्ण हे 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. पुण्यातील जे लोक फिरायला बाहेर जातायत अशा व्यक्तींना जिल्ह्यात परत आल्यानंतर पंधरा दिवस कॉरन्टाईन करण्याचा विचार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात सर्व बंद राहणार: उपमुख्यमंत्री अजित पवार
पर्यटनस्थळी गर्दी केल्यास निर्बंध वाढवणार असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात सर्व बंद राहणार असंही ते म्हणाले.
वाढत्या महागाईच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचं आंदोलन
वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसने मुंबईत आज टिळक भवनच्या समोर आंदोलन केलं. या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे आणि इतर काँग्रेसचे नेते उपस्थित होते. वाढत्या महागाईला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देश को बचाना है, राहुल गांधी को लाना है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.