एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mansukh Death Case Investigation: अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवण्याच्या कटात मनसुख हिरणही सहभागी होता, त्यामुळेच त्यानं जीव गमावला, एनआयएची कोर्टात माहिती

परमबीर सिंह आणि अनिल देशमुख प्रकरणी सचिन वाझेंची चौकशी करण्यास सीबीआयला परवानगीदोन दिवसांच्या वाढीव एनआयए कोठडीतच चौकशी करण्यास सीबीआयला मुभा

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया'बाहेर स्फोटकं ठेवण्याच्या कटात मनसुख हिरणही सहभागी होता. आणि त्यामुळेच त्याला आपला जीव गमावावा लागला असा दावा एनआयएनं बुधवारी विशेष कोर्टात केला. कारण शेवटी या संपूर्ण प्रकरणात काहीतरी मोठा आर्थिक उद्देश होता हे स्पष्ट आहे, मग तो काय होता?, याचीही चौकशी होणं आवश्यक असल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेला 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आहे. युएपीए कायद्यातील तरतूदीनुसार आरोपीची 30 दिवसांची कोठडी पूर्ण करू देण्याची मागणी एनआयएच्यावतीनं एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला केली. त्यानुसार कोर्टानं वाझे यांनी आणखीन दोन दिवसांची एनआयए कोठडी वाढवून दिली आहे. तसेच त्यांना योग्य ती वैद्यकीय सुविधा देत, पुढील सुनावणीत वाझेंच्या प्रकृतीचा अहवाल सदर करण्याचे निर्देश तपासयंत्रणेला दिले आहेत. सचिन वाझेंसह याप्रकरणात अटकेत असलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या अधिक कस्टडीची गरज नसल्याचं तपासयंत्रणेनं कोर्टाला सांगितलं. त्यानुसार कोर्टानं त्यांना चौदा दिवसांची कोठडी देत 21 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

सीबीआयला सचिन वाझेंची चौकशी करण्यास परवानगी
दरम्यान सचिन वाझे यांची चौकशी करण्यास सीबीआयला कोर्टानं परवानगी दिली आहे. सीबीआयनं बुधवारी एनआयए कोर्टात तसा रितसर अर्ज केला होता. तेव्हा आता एनआयए कस्टडीतच सीबीआय परमबीर सिंह यांच्या आरोपांची चौकशी करणार आहे. याबाबतच्या वेळा दोन्ही तपासयंत्रणांनी आपापसात मिळून ठरवाव्यात असे निर्देशही कोर्टानं दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक मुंबईत दाखल झालं आहे. काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुबई पोलिसांना दरमहा 100 कोटींचा हफ्ता वसूल करून देण्याचे आदेळ दिले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

सचिन वाझे यांनी अन्य आरोपींकडे दिलेली लाखो रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. हा पैसा कठून आला, तो कशासाठी वापरायचा होता याची चौकशी होणं आवश्यक. कारण शेवटी यामागे काहीतरी मोठा आर्थित होता हे स्पष्ट आहे, मग तो काय होता?, याची चौकशी होणं आवश्यक असल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं. या सुनावणी दरम्यान आरोपी विनायक शिंदेनं कोर्टाला आपल्याला विशिष्ठ जेलमध्ये पाठवण्याची मागणी केली. मात्र, आरोपीला जेल निवडण्याचा अधिकार नाही, रोस्टरप्रमाणे ज्या जेलसाठी नाव लागेल तिथं पाठवलं जाईल असं न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी स्पष्ट केलं.

Sachin Vaze Case: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो हे खोटं आहे : अनिल परब

सचिन वाझेंचा कोर्टाला पत्र देण्याचा प्रयत्न
बुधवार कोर्टातील सुनावणी संपायच्यावेळी आणखीन एक नाट्य पाहायला मिळालं. सचिन वाझेंनी कोर्टाला स्वत:च्या हातानं लिहिलेलं एक पत्र देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टानं हे पत्र स्वीकारण्यास नकार दिला. जर तुम्हाला काही सांगायचंय तर कलम 162 नुसार आरोपींना दिलेल्या नियमांनुसार आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले. या पत्रात वाझेंनी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याबाबत काही गौप्यस्फोट केलेत. ही माहिती समजताच अनिल परब यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत या पत्रातले सारे आरोप फेटाळून लावत असल्याचं जाहीर केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदानKiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूकAjit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget