एक्स्प्लोर
येत्या काही तासातच मान्सून महाराष्ट्रात
मुंबईः मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात काही तासातच दाखल होणार असल्याचं हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. सध्या राज्यात होत असलेला पाऊस हा मान्सून पूर्व पाऊस असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई आणि लगतच्या उपनगरात काल मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसाच्या सरीनं मुंबईकरांना चांगलच ओलंचिंब केलं. मुंबईप्रमाणे ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही वरूणराजा बरसला.
पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडले होते. गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्यांना पावसाच्या आगमनामुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांचे डोळे आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement