एक्स्प्लोर

Mandeshi Mahotsav 2023 : तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईत रंगणार माणदेशी महोत्सव; 5 जानेवारीपासून होणार सुरुवात

Mandeshi Mahotsav 2023 : माणदेशी भगिनींना रोजगार मिळावा यासाठी माणदेशी महोत्सव सुरु करण्यात आला.

Mandeshi Mahotsav 2023 : दोन वर्षानंतर ‘माणदेशी महोत्सव’ पुन्हा मुंबईमध्ये सुरु होणार आहे. यंदाचं या महोत्सवाचं हे पाचवं वर्ष आहे. 5 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान हा महोत्सव मुंबई प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. चेतना सिन्हा या माणदेशी फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा आहेत. माणदेशी भगिनींना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. माणदेशातील महिलांना त्यांच्या औद्योगिक कौशल्याशी निगडीत अनेक रोजगार या महोत्सवाच्या माध्यमातून मिळाले.  
 
यंदाच्या महोत्सवात प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी आपली कला सादर करणार आहेत. माणदेशी चॅम्पियन महिला कुस्ती त्याचबरोबर माणदेशी लोकनृत्याचा प्रकार असलेले ‘गझी नृत्य’ पाहण्यास देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे 10 लाख महिलांचा परिवार असलेल्या माणदेशातील काही शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनी आपल्या संघर्षगाथा माणदेशीच्या व्यासपीठावरुन उलगडणार आहेत.
  
यासोबत या महोत्सवात आलेले हौशी लोक कुंभारकाम करण्याचा आनंद घेऊ शकता. लाखेच्या बांगड्या बनवून घेऊ शकता, टोपली किंवा झाडू वळवून घेऊ शकता, थोडक्यात गावातली संस्कृती येथे अनुभवता येणार आहे. जर तुम्ही खवय्ये असाल तर साताऱ्याचा खर्डा, शेंगदाण्याच्या चटणीसह वेगवेगळ्या चटण्या, लोणची, ज्वारीची भाकरी, कुरड्या, मासवड्या, साताऱ्याचे जगप्रसिद्ध कंदी पेढे यांसारख्या अनेक पदार्थांची मेजवानी असणार आहे.  
 
चार दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा :
 
गुरुवार, 5 जानेवारी – पहिला दिवस -  उद्घाटन सोहळा –
10.30 वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 
गझी लोकनृत्य सादरीकरण – सायंकाळी 6.00 वाजता.
 
शुक्रवार, 6 जानेवारी – दुसरा दिवस – प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी

यांचे भारुडाचे सादरीकरण – सायंकाळी 6.00 वाजता.
 
शनिवार, 7 जानेवारी – तिसरा दिवस -  महिला कुस्ती स्पर्धा, सायंकाळी 6.00 वाजता.
 
रविवार, 8 जानेवारी – चौथा दिवस -  माणदेशातील काही शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनींची संघर्षगाथा सादरीकरण, सायंकाळी 6.00 वाजता.
 
रात्री 9.30 वाजता माणदेशी महोत्सवाची सांगता.

महत्त्वाच्या बातम्या : 

Pune vasantotsav : सूर निरागस हो! नव्या वर्षात पुणेकरांना वसंतोत्सवाची संगीत मेजवानी; तारीख जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
Ajit Pawar: सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये फाईलने तोंड लपवणारा नेता राष्ट्रवादीचा? अजित पवार म्हणाले, 'मी सुद्धा हे पाहिलं...'
सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये फाईलने तोंड लपवणारा नेता राष्ट्रवादीचा? अजित पवार म्हणाले, 'मी सुद्धा हे पाहिलं...'
Kagal Vidhan Sabha : हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : दुपारी 04 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 03 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaAnath Nathe Ambe:अनाथनाथे अंबे: ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा कालिमातेचा 08 Oct 2024Nana Patole PC FULL : 11 तारखेला मविआ पत्रकार परिषद घेणार : नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
Ajit Pawar: सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये फाईलने तोंड लपवणारा नेता राष्ट्रवादीचा? अजित पवार म्हणाले, 'मी सुद्धा हे पाहिलं...'
सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये फाईलने तोंड लपवणारा नेता राष्ट्रवादीचा? अजित पवार म्हणाले, 'मी सुद्धा हे पाहिलं...'
Kagal Vidhan Sabha : हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
Madha : माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर क्लिनिकमध्ये घुसून शाईफेक
मनोज जरांगेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर क्लिनिकमध्ये घुसून शाईफेक
Pune Crime: 32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
Embed widget