एक्स्प्लोर
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची ऑफिसमध्ये घुसून हत्या
कुमार वीणाच्या चारित्र्यांवर सतत संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. अखेर भांडणांना कंटाळून तिने दोन जानेवारीला घर सोडलं होतं. वीणा ऑफिसला जात असल्याचं समजल्याने तो तिथे आला होता.
![चारित्र्याच्या संशयातून पत्नीची ऑफिसमध्ये घुसून हत्या Man stabs wife to death at her office in Bhayander, arrested चारित्र्याच्या संशयातून पत्नीची ऑफिसमध्ये घुसून हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/30231744/Bhainder-Wife-Murder.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पत्नीच्या कार्यालयात घुसून पतीने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईजवळच्या भाईंदरमध्ये राहणाऱ्या पतीने चाकूने वार करुन पत्नीला संपवलं. चारित्र्याच्या संशयातून पतीने महिलेचा जीव घेतल्याची माहिती आहे.
32 वर्षांचा आरोपी कुमार भोईर सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पत्नीच्या कार्यालयात आला. दोघांमध्ये खटके उडाल्यानंतर कुमारने चाकू काढून 35 वर्षीय पत्नी वीणावर सपासप वार केले. कार्यालयातील सहकाऱ्यांनी वीणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं.
भोईर दाम्पत्य भाईंदरमधील मुर्धा भागात राहत होतं. कुमार वीणाच्या चारित्र्यांवर सतत संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. अखेर भांडणांना कंटाळून तिने दोन जानेवारीला घर सोडलं होतं. वीणा ऑफिसला जात असल्याचं समजल्याने तो तिथे आला होता.
पोलिसांनी आरोपी कुमार भोईरला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)