मुंबईत एटीएममध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला बेड्या
मुलुंड येथील हरिओम नगरमध्ये एटीएममध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला पोलिासांनी अटक केली आहे. हा सगळा प्रकार तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये सूट केला होता. त्यानंतर पोलिसांना त्याच्यावर कारवाई केली.
मुंबई : मुलुंडच्या नवघरमधील एका एटीएममध्ये तरुणीशी असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीने या तरुणाच्या गलिच्छ वर्तनाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला होता. तिने तो व्हिडीयो ट्विटरवर शेअर केला होता.
संदीप कुंभारकर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. मुलुंड येथील हरिओम नगरमध्ये एसबीआय बँकेच्या एटीएम हा प्रकार घडला होता. त्यानंतर तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ठाण्याच्या कोपरी विभागातून आरोपी संदीप कुंभारकर याला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हा तरुण उच्चशिक्षित आणि चांगल्या कंपनीत नोकरीवर असल्याची माहिती समोर येत आहे.
<संबंधित तरुणी वांद्रे येथून मुलुंडच्या हरिओम नगर येथे मध्यरात्री रिक्षाने आली होती. एटीएममध्ये पैसे काढण्यास गेली असता मशीनमधून पैसे निघत नव्हते. त्यावेळी तरुणीला मदत करण्याच्या बहाण्याने संदीपने एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर तरुणीला एकटं पाहून अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. यावेळी तरुणीने न घाबरता या विकृताला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केला.
तरुणीने न घाबरला घेतलेल्या भूमिकेचं लोकांकडून कौतुक होत आहे. मात्र एटीएम सारख्या ठिकाणी तरुणींचा विनयभंग होत आहे, हे प्रकरण गंभीर आहे. या घटनेनंतर मुंबईत सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी महिलांनी केली आहे.