मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण : ले. कर्नल प्रसाद पुरोहितांच्या याचिकेवर 9 जानेवारीला सुनावणी
2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादविरोधी पथकानं लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासहीत एकूण 11 जणांना अटक केली आहे. या सर्वांविरुद्ध भारतीय दंड संहितेसह मोक्कासारख्या गंभीर कायद्याखाली खटला दाखल केला आहे.

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांनी एनआयए कोर्टातील खटल्याला स्थगिती देण्यात यावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता 9 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादविरोधी पथकानं लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासहीत एकूण 11 जणांना अटक केली आहे. या सर्वांविरुद्ध भारतीय दंड संहितेसह मोक्कासारख्या गंभीर कायद्याखाली खटला दाखल केला आहे.
मात्र नंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला. याप्रकरणी संशयितांवर एनआयए कोर्टात आरोप निश्चीतीही झाली. मात्र त्याला विरोध करत या खटल्याला स्थगिती देण्यात यावी. या मागणीसाठी प्रसाद पुरोहीत यांच्यासह आणखी तिघांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती इंद्रजित महंती आणि न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.