एक्स्प्लोर
पालघरमध्ये अग्नितांडव, तारापूर एमआयडीसीत 4 कंपन्यांना भीषण आग
एमआयडीसीतील मीनार, भारत आईस, श्रीनाथ आणि प्रिमियर एंटर मीडिएट या कंपन्यांना आग लागली आहे.

पालघर : पालघरमधील तारापूर एमआयडीसीमधल्या मोहिनी केमिकल कंपनीला लागलेली आग भडकल्यामुळे आजूबाजूच्या तीन कंपन्यादेखील आगीच्या कचाट्यात सापडल्या. एमआयडीसीतील मीनार, भारत आईस, श्रीनाथ आणि प्रिमियर एंटर मीडिएट या कंपन्यांना आग लागली आहे.
संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास लागलेली आग विझवण्यासाटी अजूनही प्रयत्न सुरु आहेत. रिअॅक्टर फुटल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीत चारही कंपन्यांचं मोठं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
























