एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 4 वाहनं एकमेकांवर धडकली
![मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 4 वाहनं एकमेकांवर धडकली Major Accident On Mumbai Pune Express Way Near Khopoli मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 4 वाहनं एकमेकांवर धडकली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/27095209/Mumbai-Pune-Highway1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ चार वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. दोन ट्रेलर, एक कार आणि एका ट्रकचा अपघातग्रस्त वाहनांमध्ये समावेश आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला.
एक्सप्रेस वेच्या मुंबईकडे येणाऱ्या लेनवर चार गाड्या एकमेकांवर धडकल्या. दोन ट्रेलर, एक ट्रक आणि एक कार अशी चार वाहनांमध्ये हा अपघात झाला. यातील एका मोठ्या ट्रेलरवर लोखंडी सळ्या होत्या. त्यामुळे 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातातील मृतांची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. एका लेनने धीम्या गतीने वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion