Majha Katta : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर आयुष्य नेमकं कसं बदललं, हमीद आणि मुक्ता यांनी माझा कट्ट्यावर उलगडला आतापर्यंतचा प्रवास
Majha Katta : डॉ. नरेंद्र दाभोलकर मृत्यू प्रकरणाच्या निकालानंतर त्यांचा मुलगा डॉ. हमीद दाभोलकर आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी माझा कट्ट्यावर हजेरी लावली.
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या मारेकऱ्यांकडून आम्हाला सूड घ्यायचा नाहीय तर आम्हाला यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन हवंय, अशी त्यांची मूले डॉ. हमीद दाभोलकर (Hamid Dabholkar) आणि मुलगी मुक्ता दाभोलकर (Mukta Dabholkar) यांची भूमिका आहे. या विवेकबुद्धी मागचं कारण विचारलं असता, डॉ. हमीद दाभोलकर यांनी म्हटलं की, ते केवळ आमचे वडील होते, म्हणून आम्ही हे काम करत नाही. ते त्याचे विचार मांडत होते, ते विचार आम्हाला पटतात म्हणून आम्ही हे करतोय. हे उसणं-अवसण घेऊन काम करता येण्यासारखं काम नाही, असं हमीद यांनी म्हटलं.
हमीद आणि मुक्ता दाभोलकर माझा कट्ट्यावर
डॉ. नरेंद्र दाभोलकर मृत्यू प्रकरणाच्या निकालानंतर त्यांचा मुलगा डॉ. हमीद दाभोलकर आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी माझा कट्ट्यावर हजेरी लावली. जर तुम्हाला मनापासून ते पटलं असेल आणि तुम्हाला ती जीवनधारणा वाटत असेल, तरंच आपण हे काम करू शकतो आणि त्याच जीवनधारणीने डॉ. नरेंद्र दाभोलकर काम करत आलेले होते, त्यामुळे या भूमिकेमध्ये आपण काहीतरी वेगळं मुद्दामून आपण करतोय असं मला वाटत नाही. मुक्ताला वाटत नाही आणि त्याच्या अंनिस कार्यकर्त्यांनाही ते वाटत नसेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी पुढे म्हटलं, मला वाटते की आपण थोडं स्वतःच्या भावनांपासून तटस्थ होऊन जर बघायला सुरुवात केली तर, आपल्या लक्षात येते की 18, 20, 22, 25 वर्षाची मुलं आहेत आणि यांच्यासारखी किती तरी आहेत, त्यांच्यातला कोणीही या ठिकाणी असू शकला असता आणि अजूनही असू शकतो आणि त्याचा धोका फक्त नरेंद्र दाभोलकरांना मला किंवा मुक्ताला नाहीय, तो कुणालाही असू शकतो, हे ज्यावेळेला आपण थोडा शांतचित्ताने विचार केला तर, आपल्या लक्षात येतं. आज तुम्ही बघा की, या देशात गांधींच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली, 70 वर्षांपूर्वी आणि आज 70 वर्षानंतर काय स्थिती आहे. ना ती विचारधारा कमी झाली, ना त्याचा उदो-उदो करणं थांबलं, नथुरम गोडसेचा आज 70 वर्षानंतर उदो-उदो होतोय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर एक उदाहरण सांगायचे, ज्या वेळेला नोआखलीमध्ये दंगल झाली आणि गांधी ती शांत करायला गेलेले तुमच्यातले अनेकांना माहित असेल तर त्यांच्याकडे एक मुस्लिम हिंदू माणूस आला त्याच्या मुलाचा मुसलमानांनी खून केला होता, त्यांच्या नजरेसमोर. तो त्यांना म्हणाला की, बापू या समोरच्या लोकांनी माझ्या मुलाला माझ्यासमोर कापलं आणि त्यांच्यातल्या एकाला असा कापल्याशिवाय माझ्या मनातला शांती मिळणार नाही तर, ते गांधी होते. त्यांनी त्यांना काय उत्तर दिलं की, तुला जर खरंच मनातून शांत व्हायचं असेल तर मी तुला पर्याय सांगतो, तू एका मुस्लिम मुलाला ज्याच्या आई-वडील या दंगलीमध्ये मारले गेले आहेत त्याला तू स्वतः दत्तक घे आणि त्याचा धर्म बदलता त्याचं संगोपन कर, तरं तुझ्या मनातला अग्नी शांत होईल. त्यामुळे हे दुसऱ्यासाठी नाही करायचं, हे माझ्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.
दाभोलकरांच्या हत्येनंतर आयुष्य कसं बदललं?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर आयुष्य कसं बदललं हे सांगताना मुक्ता दाभोलकर यांनी सांगितलं की, ना वाढीचं वय आणि त्या वयामध्ये घडणारे भावनिक, मानसिक बदल, घडणाऱ्या वेगळ्या राजकीय जाणीव, या सगळ्या घडणाऱ्या काळ अर्ली अडल्ट हूड मानलं जातं. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली, तेव्हा हमीद 35 वर्षाचा होता आणि मी 39 वर्षाची होते. बाबांचा खून झाला तेव्हा तर आम्हाला असं वाटतं की, आम्ही पुन्हा नव्याने घडलो व्यक्ती म्हणून जसं आपण अडवलंसन्समध्ये आणि अडल्ट हूडमध्ये घडतो ना, तसं आम्ही पुन्हा नव्याने घडलो, कारण आपण सगळ्यांनी जी जीवनशैली निवडलेली असते, त्याच्यामध्ये एक जगणं आपल्या वाट्याला काय येणार आहे, हे आपल्याला माहिती असतं. त्याच्यापेक्षा अगदी वेगळं जगणं, आम्हाला अतिशय अनपेक्षितपणे आमच्या समोर आलं. आमच्या असं लक्षात आलं की कुठल्याही मृत्यूला किंवा कुठल्याही कठीण प्रसंगाला क्लोजर असणं खूप गरजेचं असतं, असं मुक्ता दाभोळकरांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : माझा कट्टा : डाॅ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाच्या लढ्याचे 10 वर्ष