एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमदारांची फुटबॉल मॅच, मुख्यमंत्र्यांची कॉमेंट्री तर तावडे रेफ्री!
विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा जुंपल्याचं दिसून येतं. मात्र, आज चक्क विरोधक आणि सत्ताधारीच एकत्र आले. पण विधीमंडळात नाही तर खेळाच्या मैदानावर.
मुंबई : मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यानिमित्तानं विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा जुंपल्याचं दिसून आलं. मात्र, आज (गुरुवार) चक्क विरोधक आणि सत्ताधारीच एकत्र आले. पण विधीमंडळात नाही तर खेळाच्या मैदानावर. निमित्त होतं एका खास फुटबॉल सामन्याचं.
फुटबॉलला चालना मिळावी यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विधानभवनच्या पार्किंग एरियामध्ये हा फुटबॉल सामना खेळवण्यात आला. सभापती 11 विरुद्ध अध्यक्ष 11 म्हणजेच विधानसभा विरुद्ध विधानपरिषद असा हा सामना होता. दोन्ही टीममध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार खेळाडूंचा समावेश आहे. तर या सामन्यासाठी समालोचन चक्क मुख्यमंत्र्यांनी केलं. तर तावडे या सामन्यात रेफ्री होते.
रामराजे नाईक निंबाळकर (सभापती 11) यांच्या संघानं नाणेफेक जिंकली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचा शुभारंभ केला. या सामन्यावेळी बरंच खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळाल.
अध्यक्ष 11 टीम-
आशिष शेलार, इम्तियाज जलील, सुनील शिंदे, जयकुमार रावल, संग्राम थोपटे, जयकुमार गोरे, राज पुरोहित, राजू तोडा साम, महेश लांडगे, नरेंद्र पवार, राहुल कूल, संतोष दानवे
सभापती 11 टीम-
नरेंद्र पाटील, उन्मेष पाटील, निरंजन डावखरे, संभाजी निलंगेकर, जयंत जाधव, प्रशांत ठाकूर, परिणय फुके, बाळाराम पाटील
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
करमणूक
क्राईम
Advertisement