एक्स्प्लोर

Mumbai Rains LIVE UPDATE | मुंबई : किंग सर्कल स्टेशनखाली सायन-माटुंगा पोलीस स्थानबाहेर हायवेवर अजूनही कमरेपर्यंत पाणी

मुंबईमध्ये काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा थेट परिणाम मुंबईच्या सखल भागांवर झालेला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे.

Maharashtra Rain Update heavy rainfall in mumbai waterlogging railway services shut down yellow alert Mumbai Rains LIVE UPDATE | मुंबई : किंग सर्कल स्टेशनखाली सायन-माटुंगा पोलीस स्थानबाहेर हायवेवर अजूनही कमरेपर्यंत पाणी

Background

मुंबई : मुंबई शहरासह उपनरांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी संध्याकाळपासूनच बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. तसेच येत्या 24 तासांतही मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरांतही पावसाने धुमाकूळ घातला आहे. कुर्ला-दादर दरम्यान रुळांवर पाणी साचलं असून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. तर वरळीच्या बीएमसी क्वॉर्टसमध्ये पाणी शिरलं.

मुंबईमध्ये काल सध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा थेट परिणाम मुंबईच्या सखल भागांवर झालेला आहे. मुंबई मधील परळ, दादर, सायन, वांद्रे, अंधेरी, मालाड, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांनाही नदीचं रूप आलं आहे. अंधेरी येथील सब वेमध्ये चार ते पाच फूट पाणी भरल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथे भरलेल्या पाण्यात काही रिक्षा वाहून आल्या तर बेस्टची बस देखील अडकून पडली होती.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या जीवनवाहिनीवर होण्याची शक्यता आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. कारण मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर दोन ते तीन फूट पाणी साचलं आहे. सायन रेल्वे स्थानकांतील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. अशाच प्रकारे सखल भागात असलेल्या रेल्वे स्थानकांवर देखील पाणी भरले आहे. सध्या लोकडाऊनमुळे सामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसला तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र लोकल सुरू आहेत. मात्र मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसण्याची शक्यता आहे.

प्रचंड पाऊस पडल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते कर्जत/कसारा, वाशी ते पनवेल आणि अंधेरी ते विरार शटल सर्व्हिस सुरू आहे.

मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरलं असल्यामुळे बेस्ट बसची वाहतुकदेखील अन्य मार्गांवरुन वळवण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईत सकाळी 5.30 वाजेपर्यंत कुलाबा परिसरात 122.2 मिमी आणि सांताक्रुझ येथे 273.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, मुंबईप्रमाणेच कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशातच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

16:49 PM (IST)  •  23 Sep 2020

मुंबई : सात रास्ता परिसरात दीड फूट पाणी, पावसाचा जोर वाढल्याने वाहतूक कोंडी, सर्वच रस्त्यावर पाणी आल्याने वाहांचालकांची तारांबळ
16:54 PM (IST)  •  23 Sep 2020

किंग सर्कल स्टेशनखाली सायन-माटुंगा पोलीस स्थानबाहेर हायवेवर अजूनही कमरेपर्यंत पाणी. संध्याकाळच्यावेळी घरी परतणा-या चाकरमान्यांचे हाल. बंद पडलेल्या बस आणि ट्रक खेचण्याचं काम बेस्ट प्रशासन आणि मुंबई ट्राफिक पोलिसांकडनं सुरू.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget