एक्स्प्लोर

Dasara Melava: दसरा मेळाव्याआधी वातावरण तापलं; शिवसेना आणि शिंदे गटाकडून मेळाव्याचे टीझर लाँच

Dasara Melava: दसरा मेळाव्याआधी शिवसेना आणि शिंदे गटात टीझर वॉर सुरू झाल्याचे चित्र आहे. दोन्ही बाजूने सभेसाठी टीझर लाँच करून आवाहन केले जात आहे.

Dasara Melava: शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेनेची (Shivsena) ओळख असलेल्या दसरा मेळाव्यावर (Dasara Melava) शिंदे गटाने दावा केला होता. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्कचे मैदान देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. तर, दुसऱ्या बाजूला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याआधीच शिवसेना आणि शिंदे गटात टीझर वॉर सुरू झाले आहे. शिंदे गटाने दोन टीझर लाँच केले असून शिवसेनेने आज पहिला टीझर लाँच केला आहे. 

शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली आहे. या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही बाजूने गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आली आहे. 

मेळाव्यापूर्वी टीझर लाँच 

शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी टीझर लाँच केले आहेत. गुरुवारी लाँच केलेल्या टीझरमध्ये 'एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ' अशा ओळी आहेत.  टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे. 

शुक्रवारीदेखील शिंदे गटाने एक टीझर लाँच केला असून यामध्ये सभेला येण्याचे आवाहन करताना अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर

तर, शिवसेनेकडूनही दसरा मेळाव्याचा टीझर लाँच करण्यात आला. टीझरच्या सुरुवातीला 'निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार' अशा ओळी असून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचा वापर दिसून येत आहे.  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाजात 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' अशी साद आहे. त्याशिवाय, दसरा मेळावा, शिवसेनेच्या जाहीर सभेतील दृष्ये आहेत. शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हा टीझर लाँच करण्यात आला आहे.

दसरा मेळाव्याचा दिवस जस जसा जवळ येईल तसा टीझर, पोस्टर वॉर आणखी रंगण्याची शक्यता आहे.   

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar On Mumbai Police Student Girl Harassment: व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
Harshwardhan Sapkal : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात
मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात
Mumbai Protest Video Viral: मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
High Court on Alimony: पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Embed widget