Mumbai Central Railway: बाप्पा पावला! ट्रॅकमनच्या सतर्कतेने इंद्रायणी एक्स्प्रेसचा अपघात टळला
Mumbai Central Railway: ट्रॅकमनच्या सतर्कतेने कल्याणजवळ इंद्रायणी एक्स्प्रेसचा अपघात टळला.
Mumbai Central Railway: आज सकाळी मुंबईजवळील कल्याण (Kalyan) येथे रेल्वेचा अपघात टळला. कर्तव्यदक्ष ट्रॅकमनमुळे हा अपघात टळला. कल्याण जलद डाऊन मार्गावरील रेल्वे रुळाला (Rail Fracture) तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर या मार्गावरील लोकल (Mumbai Local Trains) वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. रेल्वे रुळाला तडा गेल्याने सकाळच्या वेळेस मध्य रेल्वेवरील (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, प्रवासी सुखरूप होते.
रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना समोर आली तेव्हा इंद्रायणी एक्स्प्रेस वेगाने येत होती. त्याचवेळी कर्तव्यावर असलेले ट्रॅकमन हिरा लाल आणि मिथुन कुमार यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेतले. त्याच वेळी 23 वर्षीय मिथुन कुमारने ताबडतोब लाल सिग्नल दाखवत एक्स्प्रेसला थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तर, हिरा लाल (वय 26) हे तडा गेलेल्या रुळाजवळ उभे होते. ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला. या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली होती. सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळ दुरुस्त करण्यात आला. मात्र, या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
Trackmen detect rail fracture and stop train in time near Kalyan on 6.9.2022. https://t.co/t3KpJrh0GL
— Central Railway (@Central_Railway) September 6, 2022
दरम्यान, रेल्वे रुळाला तडा गेल्याचा परिणाम मुंबई लोकलवरही झाला होता. मुंबईच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. पाऊण तासात 7.15 वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळ तातडीने दुरुस्त करत या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सकाळच्या वेळेस कामाला जाण्याची घाई असताना लोकलचा हा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: