नवी मुंबईत पुन्हा एकदा अचानक मगर दिसल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
नवी मुंबई मनपा मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या बेलापूर खाडीत पुन्हा एकदा मगर आढळुन आल्यामुळं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
![नवी मुंबईत पुन्हा एकदा अचानक मगर दिसल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण Maharashtra News Crocodile seen near NMMC office in Belapur navi Mumbai नवी मुंबईत पुन्हा एकदा अचानक मगर दिसल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18015318/mgr.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : नवी मुंबई मनपा मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या बेलापूर खाडीत पुन्हा एकदा मगर आढळुन आल्यामुळं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
बेलापूर खाडी भागात मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांमध्येही अशीच भीती पाहायला मिळत आहे. दरम्यान, मगर दिसल्यानंतर तिचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळं हे सत्र असंच सुरु असल्यास भविष्यात सा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास यासाठी जबाबदार कोण, असाच प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
मगर दिसण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी, म्हणजेच ऑगस्ट महिन्यात नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या खाडीत एक मगर आढळून अली होती. या मगरीला पकडून इतरत्र स्थलांतरीत करावे म्हणून बेलापूर गावातील स्थानिक नागरीकांनी वन विभागाकडे मागणी केली होती. मात्र वन विभागाने स्थळ पाहणी करून देखील मगर पकडण्यासाठी कुठलीच कारवाई केली नाही.
मगरीला सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत नसल्यामुळं या भागात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांमध्ये आणि स्थानिक नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे या मगरीला वनविभाने तात्काळ पकडून इतरत्र स्थलांतरित करावे अशीच मागणी मच्छीमारांनी केली आहे.
Video | सन्मान सोहळ्यासाठी Miss India 2020 उपविजेती मान्या सिंह वहिलांच्या रिक्षातून येते तेव्हा...
मुख्य म्हणजे नवी मुंबई भागात असणारा खाडीच्या भागात पावसाळ्यात पाण्याची पातळी अधिक असते. पण, सध्या मात्र पाण्याची पातळी कमी असल्यामुळं ही मगर सहजपणे दर्शनास पडत आहे. इतकंच नव्हे, तर या भागानजीक असणाऱ्या मैदानी भागात किंवा मानवी वर्दळीमध्ये मगर गेल्यास मोठा धोका संभवतो ही बाब नाकारता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)