Mumbai School : मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक आता मराठीत झळकणार! मुंबई महानगरपालिकेने दिल्या सूचना
Mumbai School : मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयानंतर आता मुंबईतील शाळांचे मराठीत नाम फलक असावेत या युवासेनेच्या मागणीला महापालिका शिक्षण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई : मुंबईतील विद्यापीठांच्या नामफलकानंतर आता मुंबईतील सर्व शाळांचे नामलक मराठीत करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय बंधनकारक असणार आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून अनेक निर्णय घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून, महाराष्ट्र राज्यातील दुकाने व आस्थापनांचे नामफलक हे प्रथम दर्शनी मराठी भाषेमध्ये असणे अनिवार्य केले गेले. त्यानंतर युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाकडे मागणी करत मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीत व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्व महाविद्यालयाचे नाम फलक मराठीत करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला.
त्यानंतर युवासेनेने मुंबईतील शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील नामफलक सुद्धा मराठीत करण्यात यावे अशा प्रकारची मागणी केली होती. यासाठी युवा सेनेचे बीएमसी शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे त्यासोबत संतोष धोत्रे व इतर युवा सेना पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आज काढलेल्या परिपत्रकाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका मान्यताप्राप्त सर्व शाळांमध्ये सुयोग्य आकाराचे नामफलक हे मराठी देवनागरी लिपीमध्ये असावेत, असे आदेश मुंबईतील अनुदानित 394, विनाअनुदानित 678 आणि अन्य खासगी बोर्डाच्या 219 शाळांना दिले आहेत.
मात्र मुंबई महापालिका क्षेत्रातील जरी शाळांसाठी मराठी नामफलकाचे निर्णय घेण्यात आला असला तरी राज्य स्तरावर हा निर्णय अद्याप लागू झालेला नाही. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना युवासेना निवेदन देऊन राज्यभरात अशा प्रकारचा निर्णय सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी असावा, अशी मागणी करणार आहे. शालेय शिक्षण विभाग तातडीने यासंदर्भात निर्णय घेत का ते बघावं लागेल ? शिवाय इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये या निर्णयाचे पालन कशा पद्धतीने होते ? यावर सुद्धा लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या :
Mumbai University : महाविद्यालयांचे नामफलक आता मराठीत झळकणार! मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सूचना
सर्व पळवाटा बंद, आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
Mumbai University Vice Chancellor: मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंचा शोध सुरू; राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये वाद पेटणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha