Tunisha Sharma : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शेजान खानला अटक, आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणात अभिनेता शिझान खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली आहे.
Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणात अभिनेता शिझान खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली आहे. भादवी 306 प्रमाणे वालीव पोलीस ठाण्यात (Waliv Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तुनिषा शर्मा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात (JJ Hospital Mumbai) आण्यात आला आहे. आज (25 डिसेंबर) सकाळी पोस्टमार्टम केलं जाणार आहे.
शिझान खानसोबत तुनिषा शर्माचे प्रेमसंबंध
तुनिषा शर्मासोबत काम करणाऱ्या शिझान खानसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्या नैराश्यातून तिनं हे पाऊल उचललं आहे. दरम्यान शिझान खानला चौकशीसाठी कालच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. याबाबतची माहिती सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली होती. मात्र, त्यांनतर शिझान खानला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरुन शिझान विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अलीबाबा या मालिकेतील अभिनेता शिझान विरोधात तुनिषाच्या आईनं तक्रार दिली आहे. या प्रकरणात शिझानला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी शिजान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिझान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शिझानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
अनेक मालिकांमधून तुनिषाने दाखवली अभिनयाची चुणूक
अनेक मालिकांमधून तुनिषाने दाखवली अभिनयाची चुणूक दाववली होती. 'फितूर' (Fitoor), 'बार बार देखो' (Baar Baar Dekho) अशा अनेक मालिकांध्ये तुनिषाने काम केले होते. तुनिषा ही खूप श्रीमंत अभिनेत्री होती. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली तुनिषा एका प्रोजेक्टसाठी खूप मानधन घेत होती. तिने काही मोठ्या ब्रॅंड्सच्या जाहिरातींतदेखील काम केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तुनिषा शर्माने सुमारे 15 कोटी रुपयांची संपत्ती आपल्या मागे ठेवली आहे. तुनिषाचं स्वत:चं एक आलिशान घर होतं. या घराची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. आलिशान घरासोबत तुनिषा अनेक लग्झरी गाड्यांचीदेखील मालकीण होती. तुनिषा शर्माने 'भारत का वीर पुत्तर : महाराणा प्रताप' (Bharat Ka Veer Putra : Maharana Pratap), 'इंटरनेट वाला लव' (Internet Wala Love), 'अलीबाबा : दास्ताने ए कुबुल' (Ali Baba : Dastaan - E - Kabul) आणि 'इश्क सुभान अल्लाह' (Ishq Subhan Allah) अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'कहानी 2 : दुर्गा राणी सिंह' (Kahaani 2: Durga Rani Singh) या सिनेमात देखील ती झळकली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
Tunisha Sharma : शिजानसोबतच्या प्रेमसंबंधातून तुनिषाची आत्महत्या; आईची तक्रार, शिझान पोलिसांच्या ताब्यात