Hindu Jan Aakrosh Morcha : मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात, लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी
Hindu Jan Akrosh Morcha : सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चाला (Hindu Jan Aakrosh Morcha) सुरुवात झाली आहे.
Hindu Jan Akrosh Morcha : सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चाला (Hindu Jan Aakrosh Morcha) सुरुवात झाली आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park) इथून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला देखील सहभागी झाल्या आहेत.
मोर्चाच नेतृत्व महिलांकडे
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथून मोर्चाला सुरुवात केली आहे. लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पीडिताही या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. मोर्चात सहभागी झालेले नागरिक घोषणा देखील देत आहेत. या मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे. या मोर्चाचे नेतृत्व महिला करत आहेत. मोठ्या संख्येनं महिला या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. हा मोर्चा पुढे प्रभादेवीपर्यंत काढण्यात येणार आहे. त्या ठिकाणी एक सभा देखील होणार आहे. जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हम हिंदू है अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. प्रत्येक चौकाचोकात पोलिसांचा ताफा तैनात होता. अशा मोर्चांमध्ये जातीय तेढ निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली गेली.
भाजप आणि शिंदे गटाचे नेते मोर्चात सहभागी
या हिंदू जन आक्रोश मोर्चात भाजपचे नेते सहभागी झाले आहेत. सहभागी नेत्यांमध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, आमदार प्रविण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे सहभागी झाले आहेत. तर शिंदे गटाचे नेते देखील या मोर्चात सहभागी झाले आहे. नेत्यांसह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोचर्चात सहभागी झाले आहेत. मात्र, अद्याप ठाकरे गटाचे नेते या मोर्चात सहभागी झाल्याचे दिसले नाही.
महत्त्वाच्या बातम्या: