Mankhurd Fire : मानखुर्दमध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल
Mankhurd Fire News : मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) परिसरातील मंडला इथं एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
Mankhurd Fire News : मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) परिसरातील मंडला इथं एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ही आग रद्दी आणि रिकाम्या तेलाच्या ड्रममध्ये लागल्याची अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल
दरम्यान, आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे अधिकारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाच्या सुमारे 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवर दिसत आहेत. या आगीच्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.