एक्स्प्लोर

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात तपासासाठी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी आवश्यक

सीबीआय विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. कारण यापुढे सीबीआयला महाराष्ट्रात तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. राज्याच्या गृह विभागाने केंद्राशी असलेला परवानगी आदेश काढून घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात जर इतर केंद्रीय संस्थांना अर्थात सीबीआयला तपास करायचा असेल तर आता महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्याच्या गृह विभागाने केंद्राशी असलेला परवानगी आदेश काढून घेतला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. त्यानंतर टीआरपी घोटाळ्याचा तपासही सीबीआयकडे जाण्याच्या शक्यतेमुळे महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सीबीआय विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

विशेष पोलीस आस्थापना अंतर्गत सीबीआयला राज्यात येऊन तपासाचे अधिकार होते. पण, राज्याच्या गृहमंत्रालयाने 21 ऑक्टोबर रोजी तपासाची परवानगी मागे घेण्याबाबतचा जीआर जारी केला. "दिल्ली पोलीस विशेष आस्थापना अधिनियम, 1946 च्या कलम 6 नुसार प्रदान केल्याचा वापर करुन, महाराष्ट्र शासन, याद्वारे दिल्ली पोलीस विशेष आस्थनापना अधिनियममधील सदस्यांना महाराष्ट्र राज्याच्या कार्यक्षेत्रात अधिकाराचा वापर करण्यासाठी शासन आदेश गृह विभाग क्र. एमआयएस-0189/प्र.क 28/पोल-3 दिनांक फेब्रुवारी 22, 1989 द्वारे अथवा इतर कोणत्याही आदेशाद्वारे वेळोवेळी देण्यात आलेली संमती मागे घेत आहे." असं या जीआरमध्ये म्हटलं आहे.

सरकारने सीबीआयची परवानगीचा निर्णय मागे घेतला असला तरी सध्या सुरु असलेल्या प्रकरणांच्या तपासावर याचा परिणाम होणार नसल्याचं कळतं. परंतु यापुढे सीबीआयला महाराष्ट्रात तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगडनंतर महाराष्ट्रातही सीबीआयची परवानगी रद्द याआधी आंध्र प्रदेशसह पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड सरकारनेही कलम 6 चा उपयोग करुन सीबीआयला राज्यात तपासासाठी परवानगी घेणं बंधनकारक केलं होतं. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात सीबीआयच्या हस्तक्षेपावर बंदी घातली. आता सीबीआयची परवानगी रद्द करणारं महाराष्ट्र हे चौथं राज्य ठरलं आहे.

सीबीआयचा वापर राजकीय कामासाठी होतो का अशी अनेकांना शंका : अनिल देशमुख महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआय राज्यात तपास करु शकणार नाही, असा आदेश गृहविभागाने जारी केला. महाराष्ट्र सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत सीबीआय तपास करु शकणार नाही. 1989 ही परवानगी दिली होती. सीबीआय ही प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे. पण सीबीआयचा वापर राजकीय कामासाठी होतो का अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली. टीआरपी घोटाळ्याचा तपास मुंबई पोलीस करत आहे. तशाच प्रकारचा तपास उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये सीबीआय करत आहे. त्यामुळे दबाव निर्माण करुन पुढे-मागे हा तपास सीबीआयकडे जाऊ शकतो. मुंबई पोलिसांचा नावलौकिक असताना राजकीय दबावापोटी अनेक प्रकरणं सीबीआयकडे देण्यात आली. त्यामुळे पुढील काळात असा प्रकार महाराष्ट्रात घडणार नाही. मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सीबआयला 'पिंजऱ्यातील पोपट' अशी उपमा दिली होती.

सरकारच्या या निर्णयावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

राज्य-केंद्रात संघर्ष निर्माण करणं योग्य नाही : प्रवीण दरेकर "सीबीआय थेट तपास करत नाहीत. कोर्टाने आदेश दिले, कोर्टाने सांगितल्यानंतर सीबीआय हस्तक्षेप करते. राज्य सरकारने मागणी केल्यास सीबीआय हस्तक्षेप करतं. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा वाद वांरवार उभा राहत आहे, तो निश्चितपणे धोकादायक आहे," असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

कोणाला वाचवण्यासाठी, कुठल्या कारणांसाठी हा निर्णय घेतला : अतुल भातखळकर "सरकारने ही परवानगी का रद्द केली याची कारणं महाराष्ट्रातील जनतेला सांगायला हवी. असा अनाकलनीय निर्णय घेतल्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाला वाचवण्यासाठी आणि कुठल्या कारणांसाठी हा निर्णय घेतला हे मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे, असं भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं.

घोटाळे बाहेर येण्याच्या भीतीने सीबीआयला नो एन्ट्री : किरीट सोमय्या सीबीआयच्या हातात तपास गेला तर घोटाळे बाहेर येऊ शकतात अशी भीती काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीला आहे. सरकारविरुद्ध कोणी बोललं तर त्यांना घरी जाऊन मारहाण करतं, पत्रकारांनी आवाज उठवला तर त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. म्हणून यांनी सीबीआयला नो एन्ट्री केली आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe VIDEO : ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget