एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बेस्ट संप चिघळला, कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच असल्याने विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांचे आजही हाल होत आहेत.

मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर कामावर जायचं नसेल तर बेस्ट वसाहतीतल्या खोल्या खाली करा, असा आदेशही बेस्ट प्रशासनाने दिला आहे. यामुळे भोईवाडा बेस्ट वसाहतीत बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि बेस्ट प्रशासनात जुंपली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच असल्याने विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांचे आजही हाल होत आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपातून शिवसेनाप्रणित कामगार सेनेनं माघार घेतली. पण, कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्यास नकार दिला. कामगार सेनेचे 11 हजार कर्मचारी आज कामावर रुजू होणार असल्याचं संघटनेने म्हटलं, पण आज 11 हजारांपैकी फक्त 59 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने काल 500 बेस्ट बस रस्त्यावर उतरण्याची घोषणादेखील फोल ठरली आहे. परिणामी शिवसेनेच्या संघटनेतील बेबनाव समोर आला आहे. दुसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच वडाळा डेपोट बसवर दगडफेक दुसरीकडे बेस्टच्या संपात फूट पडली आहे. काही कर्मचारी कामावर रुजू होत आहेत तर काही संपावर ठाम आहेत. सकाळी वडाळा डेपोबाहेर एका बसवर दगडफेक करण्यात आली. ही बस रिकामी होती. परंतु या तणावाच्या वातावरणात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळेच वडाळा डेपोतून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या सुरक्षेत बाहेर काढलं जात आहे. संपाबाबत नामुष्की झाल्याची शिवसेनेची कबुली बेस्ट संपाबाबत झालेल्या नामुष्कीची शिवसेनेने कबुली दिली आहे. आदेश देऊनही आमच्या संघटनेतील कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत हे आम्ही मान्य करतो, असं शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितलं. बेस्ट संपातून शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेची माघार तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: बेस्ट संपात लक्ष घालणार आहे. उद्या दौऱ्यावरुन आल्यावर बेस्ट संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेणार आहेत. शिवाय कनिष्ठ कामगार श्रेणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहे. कनिष्ठ श्रेणी कर्मचाऱ्यांना समान श्रेणी, समान वेतन देण्यात येईल, अशी चर्चा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी झाल्याचं त्यांनी सांगितलं. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या - बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे - 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरु होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी - एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे - 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस - कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा - अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी संबंधित बातम्या बेस्टचा संप : टॅक्सीचालकांची मुजोरी, एसटी मुंबईकरांच्या मदतीला मुंबईत बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर, बस वाहतूक ठप्प
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Special Report : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितला फाॅर्म्युलाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP MajhaST Bus Ticket Price increase | एसटीचा तब्बल 18 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव, तिकीट महागणारMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Embed widget