शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा
कर्जमाफीचे पैसे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
शेतकरी कर्जमाफी सोहळा लाईव्ह
मुख्यमंत्र्यांचं भाषण
जाहीर केलेली कर्जमाफी आजपासून कार्यान्वित होत आहे. - आमच्या सर्वांकरता महत्वाचा आणि कर्तव्यपूर्तीचा दिवस आहे - उणे विकास दर होता, शेतीतील उत्पन्न घटत होतं, शेतीला मदत आणि पुनर्वसन पुरतं मर्यादित ठेवायचं नाही तर या खात्यात गुंतवणूक झाली पाहिजे यासाठी पहिल्या दोन वर्षात निर्णय घेतला - मागच्या तीन वर्षात तीन पट गुंतवणूक वढवलीय - उणे विकास दर 12 ते साडेबारा टक्के वाढलाय - जलयुक्त शिवार च्या माध्यमातून काही ठिकाणी तीन पिकं घेतली जात आहेत - कर्जमाफी अंतिम उपाय नाही
जो शेतकरी संस्थात्मक कर्जरचनेच्या बाहेर गेला होता त्याला पुन्हा या रचनेतून कर्ज मिळेल यासाठी प्रयत्न केलं - घेतलेलं कर्ज परत फेड करण्याची क्षमता आणि त्यातून कमाई होईल यासाठी शेतकऱ्याला सक्षम बनवू
- उच्चाधिकार मंत्री गटाच्या समितीचं अभिनंदन, त्यांनी खूप कष्ट घेतले - बँकांनी दिलेल्या आकड्यांची बेरीज 34 हजार कोटी पर्यंत गेली होती - एवढा मोठा बोजा आमच्यासाठी आव्हान होतं - मात्र पैसे उभारण्यासाठी तरतूद करू असे आश्वासन अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलं - दिवाकर रावते कायम वेळेत कर्जमाफी व्हावी यासाठी आग्रही असायचे
ऑनलाइन प्रक्रियेवर खूप टीका झाली मात्र आम्ही ती सहन केली. - कारण मागच्या कर्जमाफीत अनेक बँकांनी, व्यक्तींनी स्वतःचं चांगभलं करून घेतलं, काही बँका, सोसायटी चालवणाऱ्या लोकांना पैसा मिळाला - दीड महिन्यात 77 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केलं, 1 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली... हे रेकॉर्ड आहे. स्वीडनची लोकसंख्या 1 कोटी आहे - शेतकऱ्यांना माहिती होतं हे त्यांच्या भल्यासाठी आहे - मुंबईचे कर्ज यादीत आले. पण एवढे शेतकरी मुंबईत आले कुठून हे महाभाग शोधावेच लागतील
सरकारी कर्मचाऱ्यांना किमान 30 हजारांहून अधिकचा पगार आहे किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांना दीड लाख कर्ज कशाला? - अशा लोकांना यातून वगळले - यामुळे साडे आठ लाख लोकांची लिस्ट क्लिअर केली आणी त्यानं या ग्रीन झोन मध्ये टाकले - एकच खाते उघडले आहे, त्यात एकत्रित पैसे जमा होतील आणि लिस्ट मध्ये नावं सलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होतील
-ज्यांना प्रोत्साहन देणार आहोत त्यांनाही सरकारकडून प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करणार आहोत आणि 25 हजार रूपये देत आहोत
- सरसकट म्हणजे काय कोणतेही बंधन नसलेला म्हणजे जमीन कितीही असू दे... कोणतीही अट नसलेला अशी कर्जमाफी केलेली आहे. - आज दहा लाख शेतकरी यांना कर्जमाफी देणार होतो मात्र काही तांत्रिक अडचण आली यामुळे 8.4 लक्ष शेतकरी यांना पैसे दिले जात आहेत. - सुट्टी असल्याने सोमवारपासून ही प्रक्रिया सुरळीत सुरू होईल. - 8.4 लाख पैकी 4 लाख 62 हजार खाती ही कर्जमाफीची आहेत. कर्जमाफीचे 3200 कोटी यामध्ये जातील. - तर 3.78 प्रोत्साहनपर पैसे असे एकूण 800 कोटी देत आहोत. - 15 नोहेंबरपर्यंत 75 टक्के काम पूर्ण करू. - आम्ही अर्ज रिजेक्ट केले नाहीत. काही त्रुटी आढळली तर ते अर्ज परत भरून घेतले आहेत. - निकषांमध्ये बसणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार -काही राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांचेही आभार मानतो - अजून काही सुधारणा असतील तर जरूर सुचवाव्यात - आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समर्पित करतो सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात यापूर्वीच 20 हजार कोटींची तरतूद केली- सुधीर मुनगंटीवार इतर विभागाच्या कामामध्ये निधी देतांना मी काटकसर करत असेन, मात्र सरकारच्या तिजोरीवर सर्वात पहिला हक्क अन्नदात्याचा, शेतकऱयांचा आहे. - शेतकऱ्यासाठी असलेल्या 21 हजार कोटींचा अर्थसंकल्प आम्ही 36 हजार कोटींवर नेला - कर्जमाफीबाबत अनेकांच्या मनात शंका असतील मात्र या प्रश्नावर राज्यात राजकारण होऊ नये - हा शेतकाऱ्यांचा सरकारला दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आशीर्वाद आहे - या निर्णयासाठी सामाजिक न्याय विभागाचा पैसा वळता केला नाही, करणार नाही. - जुलैच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद असते त्यातील निधी अनुसूचित जातीसाठीची तरतूद असते - ही सुपीक डोक्यातून आलेली नापीक कल्पना आहे - आम्ही सत्तेवर नाही सत्यावर प्रेम करणारे, लाल दिव्यावर नाही तर शेतकऱ्यांच्या लाल रक्तावर प्रेम करणारे आहोत. विरोधकांकडून चांगल्या प्रश्नावर राजकारण, सामाजिक विभागाचा एकही पैसा वळता केला नाही : सुधीर मुनगंटीवारकर्जमाफीसाठी सामाजिक विभागाचा एकही पैसा वळता केला नाही : सुधीर मुनगंटीवार
राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क अन्नदात्याचा, शेतकऱ्याचा : सुधीर मुनगंटीवार
दिवाकर रावते यांचं भाषण दोन गोष्टींसाठी मुख्यमंत्र्यांचे कौतुक, शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कर्जमाफीसाठीचा आग्रह धरला होता तो मान्य केला आणि देशातली सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कर्जमाफी केली, याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. - कर्जमाफीसाठी 2016 ऐवजी 2017 पर्यंतची करा ही विनंती - या कर्जमाफीनंतर महिलांची कर्जमाफी कुटुंबाची अट शिथिल करून करावी ही विनंती - विदर्भ आणि मराठवाडा येथील शेतकऱयांना योग्य न्याय दिल्याबद्दल अभिनंदन