Maharashtra Corona Update : राज्यात आज 8602 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 6067 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात सध्या 1 लाख 06 हजार 764 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 5 लाख 80 हजार 771 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 309 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.
मुंबई : राज्यात आज 8 हजार 602 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 हजार 067 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 44 हजार 801 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के झाले आहे.
राज्यात आज 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 06 हजार 764 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 5 लाख 80 हजार 771 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 309 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.
चार जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद नाही
नंदूरबार (68), हिंगोली (72), यवतमाळ (21), गोंदिया (64), चंद्रपूर (90) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 17, 389 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर नंदूरबार, भंडारा, गोंदिया या तीन जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.
मुंबईत गेल्या 24 तासात 635 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढली आहे. काल मुंबईत 441 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज मुंबईत 625 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 582 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,04,259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,989 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 928 दिवसांवर गेला आहे.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती
आरोग्य मंत्रालयानं सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 32 हजार 906 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2020 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत 4 लाख 10 हजार 784 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच, काल दिवसभरात 49 हजार 07 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.22 टक्क्यांवर पोहोचला आहे.