एक्स्प्लोर
मुंबईतून ISI एजंट अटकेत, 70 लाखांची रोकड जप्त
मुंबई : आयएसआयच्या एजंटला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील नागपाडा भागात ही मोठी कारवाई करण्यात आली. अल्ताफ कुरेशी असे या आयएसआय एजंटचं नाव आहे.
महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली.
अल्ताफ कुरेशी हा आयएसआयसाठी हवाला ऑपरेटर म्हणून काम करायचा. उत्तर प्रदेशातील फैजाबादमधून अटक केलेला आयएसआय संशयित अफताब अली यालाही अल्ताफ कुरेशी पैसे पुरवायचा, अशी माहिती मिळते आहे.
अल्ताफ कुरेशी हा मूळचा गुजरातमधील राजकोटमधील असून, सध्या तो मुंबईत राहत होता. एटीएसने अल्ताफकडून 70 लाख रुपयांची रक्कमही जप्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement