एक्स्प्लोर

Eknath Khadse : मुख्यमंत्री गुंडांचे सरंक्षण करत असतील तर पोलिस तपास कसा करणार? एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांकडून गुंडांना संरक्षण मिळणार असेल तर पोलीस तपास कसा करणार असा सवाल त्यांनी केला.

Eknath Khadse : मुख्यमंत्री गुंडांचे सरंक्षण करत असतील तर पोलिस तपास कसा करणार असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला. रोहिणी खडसे (Rohini Khadse Attack Case) यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाच्या तपासावरून खडसे सभागृहात आक्रमक झाले. यावेळी त्यांनी ऑडिओ क्लिपचा पेनड्राइव्ह सभागृहात सादर केला. 

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर डिसेंबर 2021 मध्ये काही अज्ञातांनी हल्ला केला होता. हा हल्ला करण्यामागे शिवसेनेच कार्यकर्ते असल्याचा आरोप केला. हे शिवसैनिक मुक्ताईनगरचे शिवसेनेतून बंड करून खडसे यांच्याविरोधात विजयी झालेले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक असल्याची चर्चा त्यावेळी सुरू होती.  रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ल्याचा तपासाचा मुद्दा एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.  एकनाथ खडसे यांनी म्हटले की, रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाला त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आतपर्यंत या प्रकरणाची चौकशी झाली नसल्याचे खडसे यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही चौकशी IPS अधिकाऱ्याकडे सोपवली होती. मात्र, पोलिसांनी उलट आरोपींना सहकार्य केलं असल्याचा आरोप खडसे यांनी केला. भादंवि 307 नुसार गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्याचे खडसे यांनी सांगितले.

रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना तडिपार करण्याची नोटीस धाडण्यात आली होती. या नोटिसा रद्द करण्यात आल्या आहेत. एका महिलेवर हल्ला होतो आणि आरोपींना संरक्षण दिले जाते यापेक्षा दुसरं दुर्देव कोणते, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. अशा गुंडाना मुख्यमंत्री संरक्षण देणार असतील तर दाद कोणाकडे मागावी असा सवालही त्यांनी केला.  आपल्या आरोपांबाबतचा व्हिडिओ आणि ॲाडिओ क्लिपचा पेन ड्राईव्ह एकनाथ खडसे यांनी सभागृहात सादर केला. खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण लिखीत उत्तर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

घटना काय होती?

रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली.  या दगडफेकीनंतर त्यांनी  रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले असल्याची माहिती खडसे कुटुंबीयांकडून देण्यात आली.

तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्‍याच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. मी कारमध्ये बसलेल्या बाजूने तिघे आले.  एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने माझ्या जोराने हल्ला चढविला. मलाच मारण्यासाठी हे तिघेजण आले होते, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  14  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Amisha Patela Dating With Nirvaan Birla: कोण आहे बिझनेसमन निर्वाण बिर्ला? ज्याच्या मिठीत शिरलीये गदर फेम 49 वर्षांची अमिषा पटेल, अफेअरच्या चर्चा?
"मेरे डार्लिंग के साथ प्यारी शाम..."; 49 वर्षांच्या अमिषा पटेलनं शेअर केला रोमॅन्टिक फोटो, कुणाला करतेय डेट?
Embed widget